“मी यावेळी आयपीएलमध्ये कहर करील, कमीत कमी 4 षटकार तर ठोकीलचं” आयपीएल सुरु होण्याआधी ‘या’ दिग्गज खेळाडूने गोलंदाजाला दिला धोक्याचा इशारा..
३१ मार्चपासून आयपीएल सुरू होणार आहे. तयारीसाठी संघ शिबिरे लावत आहेत. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा खेळाडू रियान पराग याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे. पराग सध्या सराव करत आहे.
त्याचा देशांतर्गत हंगाम चांगला गेला आहे. अशा परिस्थितीत त्याचा आत्मविश्वास उंचावलाय. रियान परागने ट्विट करून घोषणा केली आहे की, यावेळी तो आयपीएलमध्ये कहर करणार आहे.

रियान परागने ट्विट केले आहे की, यावेळीमाझी अंतर आत्मा सांगते की, मी या आयपीएलमध्ये एका षटकात 4 षटकार मारनार आहे. पराग आयपीएलमध्ये बराच काळ राजस्थान रॉयल्सचा भाग आहे.
या मोसमात रियान परागच्या बॅटने खूप धावा केल्या आहेत. देशांतर्गत क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉलने चांगली कामगिरी केली आहे. परागने गुवाहाटी प्रीमियर लीगच्या 12 सामन्यात 683 धावा केल्या आहेत.
तसेच त्याने 27 बळी घेतले. या स्पर्धेतील तो मालिकावीरही ठरला. हा फॉर्म आयपीएलमध्येही कायम ठेवण्याचा तो प्रयत्न करेल. त्याने ट्वीट केलेले पाहून मात्र आयपीएलमधील इतर गोलंदाजांनी धसका घेतला असेल.
My inner conscience says i’m hitting 4 sixes in an over at some point this IPL..
— Riyan Paragg (@ParagRiyan) March 14, 2023
रियान पराग याआधी ही चमकलाय.
पराग देशभरात तेवढा फेमस नसला तरी मात्र आयपीएलमध्ये त्याचे नाव चांगलेच गाजलेलं आहे. राजस्थान रोयल्स कडून खेळतांना त्याने अनेक सामन्यात चमकदार कामगिरी केली आहे. यावर्षी ही तश्याच ताबडतोब खेळीची गरज राजस्थान रॉयल्सला असेल.
रोहितने ODI क्रिकेटमधून कर्णधारपद सोडल्यास केएल राहुल नव्हे तर ‘हा’ खेळाडू होऊ शकतो पुढील कर्णधार
चेतेश्वर पुजाराचा भीम पराक्रम! प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा ठरलाय केवळ दुसरा फलंदाज…
Ranji Trophy – सरफराज खानची खेळी व्यर्थ! दिल्लीचा मुंबईवर तब्बल ४२ वर्षांनंतर विजय…