आयपीएल 2023 आधी रॉबिन उथप्पाने केली मोठी घोषणा, आता या संघाकडून खेळणार टी-20 क्रिकेट, व्हिडीओ शेअर करत दिली माहिती!
टीम इंडियाचा झंझावाती फलंदाज रॉबिन उथप्पा पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज झाला आहे. 2007 साली T20 विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असलेला हा स्टार खेळाडू वयाच्या 37 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. रॉबिन उथप्पाने एक व्हिडिओ जारी करून आपल्या या निर्णयाची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
भारतासाठी एकूण 59 आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएलमध्ये 200 हून अधिक सामने खेळलेल्या रॉबिन उथप्पाने कॅपिटल्स ग्रुप संघाकडून खेळण्याची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज रॉबिन उथप्पा दुबई लीग (ILT20) मध्ये औपचारिकपणे सामील झाला आहे. तो दुबई कॅपिटल्स फ्रँचायझीकडून खेळताना दिसणार आहे.
रैना आणि पठाणही या लीगमध्ये खेळू शकतात.
Former India batter Robin Uthappa has signed for Dubai Capitals to play the inaugural edition of International League T20 in the UAE #ILT20 pic.twitter.com/AVKxdT6pXh
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 19, 2022
दुबई लीग (ILT20) असो किंवा कोणतीही विदेशी लीग असो, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) सक्रिय भारतीय खेळाडूंना सहभागी होण्याची परवानगी देत नाही. मात्र, निवृत्तीनंतर कोणताही खेळाडू लीगमध्ये सहभागी होऊ शकतो. अशा स्थितीत उथप्पानंतर निवृत्त झालेले सुरेश रैना आणि इरफान पठाणही आयएलटी २० मध्ये सहभागी होऊ शकतात, असे मानले जात आहे.
ILT20 लीगमध्ये सहभागी होणारा रॉबिन उथप्पा हा पहिला भारतीय क्रिकेटपटू:
रॉबिन उथप्पा सीएसकेकडून आयपीएलचा शेवटचा हंगाम खेळला होता. यानंतर, या वर्षी सप्टेंबरमध्ये त्याने भारतीय क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. यानंतर तो आता 2023 च्या पहिल्या महिन्यात जानेवारीमध्ये होणाऱ्या ILT20 लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. या लीगमध्ये खेळणारा तो पहिला भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे.
रॉबिन उथप्पाची क्रिकेट कारकीर्द: रॉबिन उथप्पाने 2006 मध्ये टीम इंडियासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. 2007 साली T20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा तो एक भाग होता. उथप्पाने टीम इंडियासाठी 46 एकदिवसीय आणि 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याने वनडेमध्ये 934 आणि टी-20 मध्ये 249 धावा केल्या आहेत.
रॉबिन उथप्पाची आयपीएल कारकीर्द: रॉबिन उथप्पाने आयपीएल 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि 2021 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दोनदा आयपीएल ट्रॉफी जिंकली. उथप्पाने आयपीएलच्या सर्व १५ हंगामात भाग घेतला होता. यादरम्यान तो 6 वेगवेगळ्या संघांसोबत खेळला. या तुफानी फलंदाजाने आपल्या कारकिर्दीत एकूण 205 आयपीएल सामने खेळले असून 130.35 च्या स्ट्राईक रेटने 4952 धावा केल्या आहेत.
हेही वाचा:
क्रिकेट मैदानावर सर्वांत जास्त स्पीडने गोलंदाजी करण्याचा विक्रम या 5 गोलंदाजांच्या नावावर राहिलाय..
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…