- Advertisement -

हे असे 4 संघ आहेत ज्यांच्या विरुद्ध रोहित शर्मा एकदिवसीय सामन्यात एकही शतक झळकवता आले नाही.

0 3

 

 

आपल्या देशात दिवसेंदवस क्रिकेट ची क्रेझ ही वाढतच चालली आहे. आपल्या देशाचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी असला तरी सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे चाहते आहेत. अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकाला क्रिकेट चे वेड आहे.

 

भारतीय क्रिकेट संघ हा जगातील सर्वाधिक कठीण असलेला संघ आहे तसेच जगभरात आपला क्रिकेट संघ सुद्धा प्रसिद्ध आहे. तसेच आपल्या देशात अनेक खेळाडूंचे जगभर चाहते आहेत या मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी, सचिन तेंडुलकर या खेळाडूंचा समावेश आहे.

 

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारतीय संघाचे सर्वात आक्रमक फलंदाज म्हणून ओळखले जात. या दोन्ही खेळाडूंच्या नावे अनेक रेकॉर्ड आहेत. अनेक शतके या खेळाडूंनी मारून आपल्या नावावर विक्रम नोंदवले आहेत. परंतु मित्रांनो रोहित शर्मा या 3 संघाविरुद्ध खेळताना त्याला एकदा सुद्धा शतक मारता आले नाही तर जाणून घेऊया कोणते आहेत ते संघ.

 

अफगाणिस्तान:-

अफगाणिस्तान क्रिकेट संघ हळूहळू खूप यशस्वी होताना आपल्याला दिसत आहे. भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माने या संघाविरुद्ध अनेक सामने खेळले आहेत, ज्यात 2 एकदिवसीय सामने आहेत. अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडेमध्ये रोहित शर्मा ला अफगाणिस्तान विरोधात एक सुद्धा शतक मारता आले नाही.

 

 

हाँगकाँग:-

रोहित शर्मा हाँगकाँगविरुद्ध केवळ दोनच एकदिवसीय सामने खेळू शकला आहे. 2008 च्या आशिया कपमध्ये त्याने एक सामना आणि 2018 मध्ये एक सामना खेळला. मात्र दोन्ही सामन्यात रोहित शर्मा ला एकही शतक झळकावता आले नाही.

 

 

आयर्लंड:-

रोहित शर्माने 2007 मध्ये आयर्लंडविरुद्ध सामना खेळला होता, जो त्याचा पदार्पणाचा सामना होता. त्या सामन्यातही रोहितने शतक झळकावले नव्हते. याशिवाय रोहितने २०१५ मध्ये आयर्लंडविरुद्ध सामना खेळला होता. त्यामध्ये रोहित शर्मा ने अवघ्या 66 धावा काढून आऊट झाला होता.

 

 

UAE:-

रोहित शर्मा UAE विरुद्ध एकदिवसीय सामना खेळला होता, ज्यामध्ये त्याला शतक झळकावता आले नाही. त्या सामन्यात रोहित शर्मा ने 57 धावांची नाबाद खेळी करून संघाला विजय मिळवून दिला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.