भारतात सध्या रणजी ट्रॉफी स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत अनेक युवा खेळाडू आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधून घेण्याच्या प्रयत्नात आहेत. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूला भारतीय संघात संधी मिळण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे सर्वच युवा खेळाडू प्रचंड मेहनत करताना दिसून येत असतात. याच खेळाडूंपैकी एक खेळाडू म्हणजे रोहित रायुडू, जो हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करतोय.
रणजी ट्रॉफी स्पर्धेत जोरदार कामगिरी करण्यापूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत देखील तुफान फटकेबाजी केली होती. हैदराबाद संघ रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर झाला असला तरीदेखील रोहितने आपल्या फलंदाजीने सर्वांचे मन जिंकून घेतले आहे. चला तर जाणून घेऊया त्याच्या कामगिरी बद्दल अधिक.
रोहित रायुडू हा अंबाती रायुडूचा भाऊ आहे. त्याने या हंगामात अप्रतिम फलंदाजी केली आहे. त्याने ७ सामन्यांतील १४ डावांमध्ये ३ अर्धशतके आणि १ शतक झळकावले आहे. तर १५३ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी राहिली आहे. त्याने या हंगामात एकूण ५७५ धावा केल्या आहेत.
रोहित रायुडूची शेवटच्या १४ डावातील कामगिरी
हैदराबाद विरुद्ध दिल्ली – १५३* आणि ३२
हैदराबाद विरुद्ध महाराष्ट्र – ६८ आणि ३७
हैदराबाद विरुद्ध सौराष्ट्र – २३ आणि ०
हैदराबाद विरुद्ध आंध्र – ६ आणि ४६
हैदराबाद विरुद्ध आसाम – ६० आणि २०
हैदराबाद विरुद्ध मुंबई – ७७ आणि ८
हैदराबाद विरुद्ध तामिळनाडू – ० आणि ४५

हैदराबादचा संघ रणजी ट्रॉफी जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. हैदराबाद संघाने ७ सामने खेळले, त्यापैकी ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तर एक सामना अनिर्णीत राहिला.
हे ही वाचा..
शुभमन गिलने सुरेश रैनाचा विक्रम मोडत केली सचिन तेंडुलकर अन् विनोद कांबळीच्या विक्रमाची बरोबरी..
शुभमन गिल नव्हे तर सूर्यकुमार यादवने ‘या’ खेळाडूला म्हटले ‘गेम चेंजर’