भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या वनडे सामन्यात भारतीय संघाने ९० धावांनी जोरदार विजय मिळवला. यासह मालिका ३-० ने आपल्या खिशात घातली आहे. अंतिम सामन्यात रोहित शर्मा, शुभमन गिल आणि शार्दुल ठाकूर हे सामन्याचे हिरो ठरले. शार्दुल ठाकूरने अशावेळी भारतीय संघाला विकेट्स मिळवून दिले जेव्हा भारतीय संघ हा सामना गमावण्याच्या वाटेवर होता. जेव्हा दोन फलंदाज चांगली फलंदाजी करत असतात, त्यावेळी ती जोडी कशी तोडायची हे, शार्दुलला चांगलच माहीत आहे. मात्र टी धावा देखील खर्च करतो.
रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी या सामन्यात शतकी खेळी केली. या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने ३८६ धावांचा डोंगर उभारला होता. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाकडून डेवोन कॉनव्हे आक्रमक फलंदाजी करत होता. त्यावेळी असे वाटत होते की, न्यूझीलंड संघ हा सामना सहजरीत्या जिंकू शकतो. कॉनव्हे आणि निकोल्सने मिळवून भारतीय गोलंदाजांवर दबाव आणला होता. त्यामुळे रोहित शर्माची चिंता वाढली होती.
भारतीय गोलंदाज विकेट्स घेत होते,मात्र रोहितला माहीत होतं जोपर्यंत कॉनव्हे खेळपट्टीवर आहे. तोपर्यंत सामना जिंकणं जरा कठीण आहे. दरम्यान शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना कॉनव्हेने चौकार मारला. त्यामुळे रोहित शर्मा संताप व्यक्त करताना दिसून आला होता.
रोहित धावत शार्दुल ठाकूरकडे गेला आणि त्याला काहीतरी म्हणू लागला. रोहित शर्मा संतापलेला आहे,हे त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसून येत होते. शार्दुल ठाकूरने टाकलेल्या लाईन लेंथमुळे रोहित शर्मा संतापल्याचे पाहायला मिळाले होते. या सामन्यात शार्दुलने फलंदाजी करताना २५ धावा केल्या. तर गोलंदाजी करना त्याने ३ महत्वपूर्ण गडी बाद केले.
हे ही वाचा..
ठरलं तर ‘या’ दिवशी होणार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन! स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..