अलीकडेच, भारतीय कर्णधार रोहित शर्माचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यात तो खेळाडूंना शिवीगाळ करताना आणि अंपायरशी मजेशीरपणे बोलतांना दिसत आहे. अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेदरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माचा असाच एक रोमांचक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मागच्या महिन्यात झालेल्या तिसऱ्या सामन्यात, स्टंप माइकमध्ये रोहित शर्माचे संभाषण टिपले गेले, ज्यामध्ये तो अंपायरच्या निर्णयावर नाराज असल्याचे दिसून आले. या कथेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्याचवेळी आता हिटमॅन (रोहित शर्मा) या प्रकरणावर उघडपणे बोलला आहे.
रोहित शर्माने केला मोठा खुलासा !
रोहित शर्माने धरमशाला येथे खेळल्या जाणाऱ्या पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी सांगितले की, पंचाला फटकारण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. “जेव्हा तुम्ही सलग दोन सामन्यांत शून्य धावा करून येत असाल, तेव्हा पहिल्या धावा करणे किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला माहीत आहे. मी बॅटने चौकार मारला, पण कदाचित अंपायरच्या लक्षात आले नाही आणि त्याने लेग बाय दिला.” म्हणून माझा थोडा राग अनावर झाला होता.
मी धावफलक बघत नाही : रोहित शर्मा
या प्रकरणाला पुढे नेत रोहित शर्मा म्हणाला की, :मी फलंदाजी करताना धावफलकाकडे पाहत नाही. मी सहसा फलंदाजी करताना धावफलकाकडे जास्त पाहत नाही. माझे लक्ष फलंदाजीवर असते, पण षटक संपले की, माझी नजर धावफलकाकडे जाते. मी पाहिले की रोहित शर्मा अजूनही शून्यावर आहे. मी नुकताच चौकार मारल्यासारखे वाटले. अशा परिस्थितीत मी अजूनही शून्यावर कसा आहे? अशा स्थितीत मी पंच वीरू यांना विचारले की, तुम्ही चेंडू मांडीच्या पॅडवर आदळण्याचा संकेत दिला होता का?
हे होते संपूर्ण प्रकरण..
अफगाणिस्तानविरुद्ध खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. अशा परिस्थितीत तो तिसऱ्या सामन्यात फलंदाजीला आला तेव्हा त्याला चौकार मारून खाते उघडायचे होते. पण अंपायरने त्याचा शॉट लेग बाय म्हणून घोषित केला. यानंतर त्याने अंपायरशी बोलायला सुरुवात केली आणि “वीरू थाई पड दिया क्या पहला बॉल, इतना बड़ा बात लगा है भाई, माझ्याकडे आधीच दोन शून्य आहेत” असे म्हणताना ऐकू आले. त्याचा हा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
==
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.
हेही वाचा: