IND vs BAN:आयसीसी 2023 विश्वचषक (World Cup 2023) स्पर्धेत भारतीय संघ रोहित शर्माच्या (Captain Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळत आहे. भारतीय संघ तुफान फार्मात असून सुरुवातीचे पहिले तीन सामने जिंकत विजयाचे हॅट्रिक नोंदवली आहे. भारताचा पुढचा चौथा सामना बांगलादेश विरुद्ध (IND vs BAN) 19 ऑक्टोंबर रोजी पुण्याच्या गहुंजे स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यात रोहित शर्माला आणखीन एक विक्रम मोडण्याची संधी आहे. माझी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms Dhoni) याचा हा विक्रम असून तो मोडण्याची संधी रोहित शर्माला चालून आली आहे.
IND vs BAN सामन्यात रोहित शर्मा मोडू शकतो धोनीचा हा मोठा विक्रम..
विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना रोहित शर्माने आतापर्यंत 217 धावा केल्या आहेत. त्याने आणखीन 25 धावा केल्या तर महेंद्रसिंग धोनीचा विक्रम मोडू शकतो. यंदाच्या विश्व कप स्पर्धेत रोहित शर्माने एक शतक आणि एक अर्धशतकाच्या जोरावर एकूण 217 धावा केल्या आहेत. बांगलादेश विरुद्धच्या सामन्या देखील त्याच्याकडून अशाच मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व सौरभ गांगुली यांनी केले होते. कर्णधार म्हणून स्पर्धेत खेळताना सौरव गांगुलीने 465 धावा काढल्या होत्या. त्यावेळी संघात तो वन डाऊन पोझिशन वर खेळत होता. विश्वचषक स्पर्धेत कर्णधार म्हणून खेळताना सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये तो पहिल्या स्थानावर आहे
इंग्लंड मध्ये 2019 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व किंग कोहली ने केले होते. मधल्या फळीत खेळणारा कोहलीने या स्पर्धेत धमाकेदार कामगिरी करत 433 धावांचे योगदान दिले होते. कर्णधार म्हणून खेळताना त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. या स्पर्धेत सेमी फायनल मध्ये न्युझीलंडने भारताचा पराभव केला होता.
1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचा कर्णधार कर्णधार म्हणून कपिल देव यांनी भूमिका बजावली होती. संपूर्ण स्पर्धेत त्यांनी बहारदार खेळ दाखवत 303 धावा केल्या होत्या त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्यांदा विश्वचषकावर नाव कोरले होते.

महेंद्रसिंग धोनीने 2011 आणि 2015 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. 2011 साली भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याने सहाव्या क्रमांकावर खेळताना 241 धावा केल्या होत्या तर 2015 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या विश्वचषक स्पर्धेत त्याच्या नावावर 237 धावांची नोंद आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषकावर 28 वर्षानंतर आपले नाव कोरले होते. आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धा भारतात होत असल्याने यंदा पुन्हा एकदा स्टार खेळाडूंनी सजलेल्या भारतीय संघाला विश्वचषक जिंकण्याची संधी चालून आली आहे.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी