Rohit Sharma’s Records: भारत आणि इंग्लंड यांच्यात लखनऊच्या इकाना मैदानावर विश्वचषक स्पर्धेतला 29 वा सामना सुरू आहे या मैदानात उतरताच रोहित शर्माने एक नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. कर्णधार म्हणून खेळताना रोहित शर्माचा हा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. 100 आंतरराष्ट्रीय सामन्यात संघाचे नेतृत्व करणारा तो जगातला 50वा खेळाडू बनला आहे.
शंभर सामन्यात नेतृत्व करणारा भारताचा सातवा खेळाडू बनला आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी मोहम्मद अझरुद्दीन, विराट कोहली, सौरव गांगुली, कपिल देव आणि राहुल द्रविड यांनी 100 पेक्षा अधिक सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचे सध्याचे दोन्ही विराट आणि रोहित शर्मा यांनीच वनडे, टेस्ट आणि T20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.
महेंद्रसिंग धोनीने 332 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी 178 सामन्यात भारताचा विजय झाला आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011 मध्ये विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. तसेच धोनी हा आयसीसीच्या तिन्ही ट्रॉफी जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे.
धोनी नंतर मोहम्मद अझरुद्दीन यांनी 221 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व सांभाळले. त्यापैकी 104 सामन्यातच भारताला विजय मिळवता आला. तर 90 सामन्यात भारताचा पराभव झाला होता. मोहम्मद अझरुद्दीन यांनी दीर्घकाळ भारतीय संघाचे नेतृत्व संभाळले होते. मात्र एकाही मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाला यश आले नाही.
‘चेसमास्टर’ विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली संघाने 135 आंतरराष्ट्रीय सामन्यात विजय मिळवला होता विराटने 213 सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. कसोटी वनडे आणि टी-20 सामन्यात त्याने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते.
कपिल देव यांनी 108 सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सांभाळली होती. त्यात केवळ त्यांना 43 सामन्यात भारताला विजय मिळवून देता आला. 1983 मध्ये त्यांच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघाने बलाढ्य वेस्टइंडीज संघाला पराभूत करत विश्वचषकावर आपले नाव कोरले होते.
सध्या भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची धुरा सांभाळणारा राहुल द्रविड याने त्याच्या कारकिर्दीमध्ये 104 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले होते त्यापैकी केवळ 50 सामन्यातच भारताला विजय मिळवता आला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 2007 मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत साखळी सामन्यातूनच बाहेर पडावे लागले.
रोहित शर्मा याने शंभर आंतरराष्ट्रीय सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे त्यापैकी त्याने 73 भारताला विजय मिळवून दिला आहे. विराट कोहलीने राजीनामा दिल्यानंतर संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही रोहितच्या खांद्यावर येऊन पडली.
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा एक फलंदाज म्हणून यशस्वी ठरला तरी संघाचे नेतृत्व करत असताना त्याला फारसे यश लाभले नाही. त्याने 98 सामन्यात भारतीय संघाचे नेतृत्व केले तर त्यातील 27 सामन्यात भारताला यश मिळाले. तब्बल 52 सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी