IPL 2024 MI vs CSK: IPL 2024 च्या 29 व्या आणि सर्वात रोमांचक सामन्यात, पहिल्या डावात CSK माजी कर्णधार एमएस धोनीने एक नवीन विक्रम केला, तर दुसऱ्या डावात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माने एक विशेष विक्रम केला. या दोन्ही फलंदाजांनी असे विक्रम केले आहेत जे आजपर्यंत कोणत्याही भारतीय फलंदाजाला करता आलेले नाहीत. या सामन्यात आधी धोनीची जादू दिसली आणि नंतर दुसऱ्या डावात हिटमॅनचा षटकार पाहायला मिळाला. आता रोहितने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला आहे.
MI vs CSK: रोहित शर्मा बनला सिक्सर किंग !
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माची जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. या सामन्यात रोहितने तिसरा षटकार ठोकताच टी-२० क्रिकेटमध्ये नवा इतिहास रचला. रोहित शर्मा आता T20 क्रिकेटमध्ये 500 हून अधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या सामन्यापूर्वी रोहितच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 497 षटकार होते. या सामन्यात रोहितने चेन्नईच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले आहे.
MI vs CSK: या यादीत रोहितनंतर भारतीय फलंदाजांचा समावेश आहे,
𝙃𝙞𝙩𝙢𝙖𝙣 for a reason 🙇♂️#MumbaiMeriJaan #MumbaiIndians #MIvCSK pic.twitter.com/AyJRslcbGt
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2024
रोहित शर्मा आता T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे. या यादीत विराट कोहलीचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. कोहलीने टी-20 क्रिकेटमध्ये आतापर्यंत 383 षटकार मारले आहेत. याशिवाय टीम इंडिया आणि सीएसकेचा माजी कर्णधार एमएस धोनीचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. एमएस धोनीच्या नावावर टी-20 क्रिकेटमध्ये 328 षटकार आहेत. या यादीत चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा माजी क्रिकेटर आणि ‘मिस्टर आयपीएल’ सुरेश रैनाचे नाव आहे. टी-20 क्रिकेटमध्ये रैनाच्या नावावर 325 षटकार होते. (ROHIT SHARMA COMPELTED 500 SIXES IN IPL)
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.