IND vs ENG 5TH TEST: WTC मध्ये ‘भीम पराक्रम’करण्यापासून केवळ एक पाउल दूर हिटमॅन, धरमशाळा कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्मा रचू शकतो इतिहास,

IND vs ENG 5TH TEST: WTC मध्ये 'भीम पराक्रम'करण्यापासून केवळ एक पाउल दूर हिटमॅन, धरमशाळा कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्मा रचू शकतो इतिहास,

IND vs ENG 5TH TEST:  भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना ७ मार्चपासून धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाचा कर्णधार आणि स्फोटक सलामीवीर रोहित शर्माला एक मोठा विक्रम करण्याची संधी असेल. नक्की कोणता आहे हा विक्रम जाणून घेऊया या बातमीच्या माध्यमातून..

IND vs ENG: 5 व्या कसोटीमध्ये रोहित शर्मा करू शकतो हा खास विक्रम..

हिटमॅनला ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) मध्ये 50 षटकार पूर्ण करण्यासाठी फक्त 1 षटकार आवश्यक आहे. रोहितने हा टप्पा गाठला तर तो हा पराक्रम करणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा फलंदाज ठरेल.

IND vs ENG 5th Test: रोहित आणि कंपनीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, धरमशाला कसोटी जिंकली तर मोडणार ‘हा’ 112 वर्षाचा विक्रम..

IND vs ENG: कसोटी मालिका जिंकल्यानंतर रोहित शर्मा भलताच खुश, युवा खेळाडूंची स्तुती करतांना केले मोठ विधान..

आतापर्यंत केवळ इंग्लंडचा कसोटी कर्णधार आणि महान अष्टपैलू बेन स्टोक्सने डब्ल्यूटीसीमध्ये ५० षटकारांचा आकडा गाठला आहे. त्याने 44 सामन्यांच्या 81 डावात 78 षटकार मारले आहेत. मात्र, हिटमॅन या यादीत स्थान मिळवण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. त्याने 31 कसोटी सामन्यांच्या 53 डावात 49 षटकार मारले आहेत.

भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने 24 कसोटी सामन्यांच्या 41 डावांमध्ये 38 षटकार मारले आहेत.

IND vs ENG 5th Test: रोहित आणि कंपनीला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी, धरमशाला कसोटी जिंकली तर मोडणार 'हा' 112 वर्षाचा विक्रम..

या यादीत चौथे नाव इंग्लंडचा यष्टिरक्षक फलंदाज जॉनी बेअरस्टोचे आहे, ज्याने 34 सामन्यांच्या 65 डावात 27 षटकार ठोकले आहेत, तर पाचव्या क्रमांकावर भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज यशस्वी जैस्वाल आहे. त्याने 8 सामन्यांच्या 15 डावात 26 षटकार मारले आहेत.

जर आपण रोहित शर्माच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोललो तर, त्याने आतापर्यंत 58 सामन्यांच्या 100 डावांमध्ये 45 च्या सरासरीने 4034 धावा केल्या आहेत ज्यात 11 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. उजव्या हाताच्या फलंदाजाची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या २१२ आहे. त्याने 439 चौकार आणि 81 षटकार मारले आहेत.

IND vs ENG 5TH TEST: WTC मध्ये  'भीम पराक्रम'करण्यापासून केवळ एक पाउल दूर हिटमॅन, धरमशाळा कसोटीमध्ये कर्णधार रोहित शर्मा रचू शकतो इतिहास,

इंग्लंडविरुद्धच्या सध्याच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माची चमकदार कामगिरी

रोहित शर्मा सध्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत व्यस्त आहे. त्याने आतापर्यंत या मालिकेत चांगली कामगिरी केली आहे. रोहितने 4 सामन्यांच्या 8 डावात सुमारे 40 च्या सरासरीने 297 धावा केल्या आहेत ज्यात 1 शतक आणि 1 अर्धशतकांचा समावेश आहे. शर्माने सध्याच्या मालिकेत 4 षटकार आणि 35 चौकार मारले आहेत.

उल्लेखनीय आहे की भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 3-1 ने आघाडीवर आहे. यजमानांनी पहिल्या कसोटीतील पराभवानंतर नेत्रदीपक पुनरागमन केले आणि पुढच्या तीन सामन्यांमध्ये सलगपणे ब्रिटीशांचा पराभव करून मालिका जिंकली आहे. मालिकेतील शेवटचा सामना हा 7 तारखेपासून सुरु होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे विशेषता रोहित शर्माकडे संपूर्ण क्रीडा विश्वाचे लक्ष असेल.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *