‘तू खरोखर हिटमॅन आहेस ना?’ सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाल्याने कर्णधार रोहित शर्मा होतोय ट्रोल, धोनीच्या एका खेळीमुळे आयपीएलमधील सर्वांत नकोसा विक्रम रोहितच्या नावावर.
‘तू खरोखर हिटमॅन आहेस ना?’ सलग दुसऱ्या डावात शून्यावर बाद झाल्याने कर्णधार रोहित शर्मा होतोय ट्रोल, धोनीच्या एका खेळीमुळे आयपीएलमधील सर्वांत नकोसा विक्रम रोहितच्या नावावर.
चेन्नई सुपर किंग्ज (Csk) आणि मुंबई इंडियन्स (Mi) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात मुंबईचा संघ सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कारण CSK ने आज पहिल्याच षटकापासून एमआयवर हल्ला चढवला. कर्णधार रोहित शर्मा आज सलामीला आला नाही पण दुसऱ्या क्रमांकावर असतानाही तो फार काही करू शकला नाही आणि शून्यावर बाद झाला.

रोहित शर्मा पुन्हा एकदा महेंद्रसिंग धोनीच्या जाळ्यात अडकला. दीपक चहरने आज स्लो बॉलिंगला सुरुवात केली. त्यानंतर धोनी विकेटजवळ आला. अशा स्थितीत चहरने पुन्हा एकदा स्लो चेंडू टाकला, ज्यावर रोहित शर्माने स्वीप शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. जिथे चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन थेट रवींद्र जडेजाच्या हातात गेला.
रोहित शर्माच्या नावावर झाला नकोसा विक्रम..
गल्या सामन्यातही रोहित शर्मा शून्यावर बाद झाला होता. तर आज पुन्हा तो शून्यावर पॅव्हेलियनमध्ये परतला. यासह रोहित शर्मा आयपीएलमध्ये 16व्यांदा शून्यावर आऊट झाला. रोहित सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे. रोहितशिवाय सुनील नरेन, मनदीप सिंग आणि दिनेश कार्तिक १५-१५ वेळा शून्यावर बाद झाले आहेत.
रोहित शून्यावर बाद होताच सोशल मिडीयावर होतोय जोरदार ट्रोल..
– No drama
– No fight
– No agression
– No abusive behaviour
– No performance16 Ducks in IPL by the Duckman – Rohit Sharma #CSKvMI pic.twitter.com/0R3YNJHzxo
— Priyanshu (@PriyanshuVK18K) May 6, 2023
असे आहेत दोन्ही संघ..
चेन्नई सुपर किंग्जची प्लेइंग इलेव्हन
रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (सी आणि विकेट), दीपक चहर, मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महेश टेकशाना
मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (क), इशान किशन (विकेटकीपर), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, ट्रिस्टन स्टब्स, टिम डेव्हिड्स, नेहल वढेरा, जोफ्रा आर्चर, पियुष चावला, आकाश मधवाल, अर्शद खान