लवकर आऊट झाल्यावर वडापाव खाईन”, रोहित शर्मा २८ धावा करून बाद, चाहत्यांनी मीम्सच्या माध्यमातून ट्रोल केले.
IPL चा 25 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH vs MI) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माला नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी मैदानात यावे लागले. या सामन्यात हिटमॅनने वेगवान फलंदाजी करत आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण हिटमॅनला मोठी खेळी खेळता आली नाही आणि टी नटराजनच्या षटकात 28 धावा देऊन बाद झाला. त्याच्याकडून स्वस्तात बाद झाल्यानंतर चाहते सोशल मीडियावर त्याची खिल्ली उडवत आहेत.

आयपीएलच्या 16व्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माची बॅट शांत दिसत आहे. हा मोसम त्याच्यासाठी अजून चांगला गेला नाही. तो धावा काढण्यासाठी धडपडताना दिसत आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या या सामन्यात कर्णधार मोठी खेळी करेल, अशा आशा चाहत्यांना होत्या.
पण रोहित चाहत्यांच्या अपेक्षांवर खरा उतरू शकला नाही आणि 18 चेंडूत 28 धावा करून स्वस्तात बाद झाला. त्याने आतापर्यंत ५ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये दिल्लीविरुद्धची अर्धशतकी खेळी यशस्वी ठरली. त्यानंतर त्याला 4 डावात 1, 21, 20 आणि 28 धावाच करता आल्या. त्याच्या खराब कामगिरीनंतर चाहते रोहितच्या खराब फलंदाजीची खिल्ली उडवत आहेत. कारण रोहित एका मुलाखीदरम्यान बोलला की जर मे पुढच्या मॅच मद्ये लवकर आऊट झालो तर वडापाव खाईल.