VIRAL VIDEO:कर्णधार रोहित शर्माने मिचेल स्टार्कला ठोकला जबरदस्त षटकार, स्मिथसुद्धा झाला हैराण,व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..
VIRAL VIDEO:कर्णधार रोहित शर्माने मिचेल स्टार्कला ठोकला जबरदस्त षटकार, स्मिथसुद्धा झाला हैराण,व्हीडीओ होतोय तूफान व्हायरल..
कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी तिसऱ्या वनडेत टीम इंडियाला शानदार सुरुवात करून दिली आहे. रोहित शर्माने छोटी पण जबरदस्त खेळी खेळली. यादरम्यान त्याने कांगारू वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कला लक्ष्य करत शानदार फटके खेळले. रोहितच्या या छोट्याश्या खेळीमधील एक व्हीडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मिचेल स्टार्कच्या सरळ चेंडूवर रोहित शर्माने शानदार शॉट मारला. त्याने वेगवान चेंडूवर बॅटचे तोंड उघडले, ज्यामुळे चेंडू थेट सीमारेषेवर गेला. रोहितचा सरळ फटकेबाजी पाहून चेन्नईतील चाहत्यांनी चांगलाच जल्लोष केला. त्यानंतर त्याने काही उत्कृष्ट शॉट्स खेळले. त्यामुळे भारतीय संघाला दमदार सुरुवात झाली आहे.

रोहित 30 धावा करून बाद झाला.
वेगवान धावा काढत कर्णधार रोहित शर्मा बाद झाला. कर्णधाराने 17 चेंडूत 30 धावांची जलद खेळी खेळली. यादरम्यान त्याने 2 शानदार चौकार आणि 2 जबरदस्त षटकार मारले. रोहितची फलंदाजी पाहून असे वाटत होते की, त्याने या शैलीत फलंदाजी केली तर टीम इंडिया सहज लक्ष्य गाठेल. पण सीन अॅबॉटच्या चेंडूवर पुल शॉट घेण्याच्या प्रक्रियेत त्याने त्याचा विकेट गमावला.
टिम इंडियाचा स्कोअर सध्या 154 धाववर 4विकेट आहेत. कर्णधार रोहित शर्मा 30,सलामीवीर शुभमन गिल 37,केएल राहुल 32 आणि अक्षर पटेल 2धावा काढून बाद झाले तर स्टार क्रिकेटर विराट कोहली आणि हार्दिक पंड्या सध्या फलंदाजी करत आहेत.
विराट कोहलीने पूर्ण केले अर्धशतक..
शानदार फॉर्ममध्ये असलेल्या विराट कोहलीने आज शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात पुन्हा एकदा जबरदस्त फलंदाजी करत आपले अर्धशतक पुर्ण केले. विराट 63 चेंडूत शानदार 50धावा करून मैदानावर खेळत आहे.
https://twitter.com/Nancyy079/status/1638540693009481729?s=20