भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा जगातल्या अशा फलंदाजांपैकी एक आहे, जो स्वतःच्या हिमतीवर सामन्याचा नूर कोणत्याही क्षणी पलटू शकतो. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत तो धावांचा पाऊस पाडतोय. विश्वचषक स्पर्धेतील न्यूझीलंड विरुद्धच्या पाचव्या सामन्यात त्याने 40 चेंडूत 46 धावांची खेळी केली. यात 4 चौकार अन 4 षटकरांचा समावेश होता. यासह त्याने एक नवा विक्रम स्वतःच्या नावे केला आहे.
2023 मध्ये एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक 50 षटकार ठोकणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. अशी कामगिरी यापूर्वी कोणत्याच भारतीय खेळाडूला करता आली नाही. यंदाचे वर्ष संपण्यासाठी अजून अडीच महिन्याचा कालावधी आहे तसेच भारताला विश्वचषक स्पर्धा आणि त्यानंतर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध सामने खेळायचे आहे. त्यामुळे या विक्रमात आणखीन भर पडू शकते.
यापूर्वी 2015 मध्ये वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलने एकाच कॅलेंडर वर्षात षटकारांचे अर्धशतक ठोकले होते. एकाच वर्षात 58 षटकार ठोकण्याची नोंद गेलच्या नवावर आहे. एकाच वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये गेल पहिल्या स्थानावर आहे.
दक्षिण आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज ए बी डिव्हिलियर्स याने 2019 मध्ये एकाच वर्षात 56 षटकार ठोकल्याची नोंद आहे. डिव्हिलियर्सला गेलचा विक्रम मोडण्याची संधी होती मात्र तो करू शकला नाही. सध्या गेल आणि डिव्हिलियर्स हे दोन्ही खेळाडू क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत.
पाकिस्तानचा स्फोटक फलंदाज शाहिद आफ्रिदीने त्याच्या कारकिर्दीमध्ये अनेक षटकार ठोकले आहेत. 2002 मध्ये तो दमदार फॉर्ममध्ये होता. एकाच वर्षात त्यांनी तब्बल 48 षटकार ठोकले होते त्याचा हा विक्रम गेल्या 13 वर्षापासून अबाधित होता. 2015 मध्ये ख्रिस गेल ने 58 षटकार ठोकून शाहिद आफ्रिदीचा विक्रम मोडून काढला.
रोहित शर्माने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील 5 सामन्यात 62.00 च्या सरासरीने 311 धावा केल्या आहेत. स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या खेळाडूंच्या यादीमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे. तर विराट कोहली एक शतक आणि तीन अर्धशतकाच्या जोरावर पाच सामन्यात 354 धावा केल्या आहेत. विश्वशषकात भारताचा पुढचा सामना इंग्लंड विरुद्ध होणार आहे. तर त्यानंतर दक्षिण आफ्रिका श्रीलंका आणि नेदरलँड या संघाविरुद्ध होतील.
सामन्या बाबतीत बोलायचे झाले तर, न्यूझीलंडचा चार गडी राखून पराभव केला. विश्वचषक स्पर्धेतील टॉपवर असलेल्या या दोन संघामध्ये हाय व्होल्टेज सामना झाला. यामध्ये चेसमास्टर विराट कोहलीने दबंग स्टाईलने 95 धावा काढत भारतीय संघाला विजय मिळवून दिला. तब्बल 20 वर्षानंतर म्हणजेच दोन दशकानंतर भारतीय संघाने न्यूझीलंडचा विश्वचषक स्पर्धेत पराभव केला आहे.
हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..
- ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.
- अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी