- Advertisement -

टीम डेव्हिड-कॅमेरून ग्रीनला का शिव्या देत आहात, रोहित शर्मामुळे सामना हरला!

0 4

मुंबई इंडियन्सचा लखनौविरुद्धचा अत्यंत महत्त्वाचा सामना हरला. शेवटच्या षटकात संघाला केवळ 11 धावांची गरज होती मात्र टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीन केवळ 5 धावा करू शकले.

यावेळी मुंबई इंडियन्सचे चाहते खूप निराश झाले आहेत. निराशेचे कारण म्हणजे आयपीएलचा ६३वा सामना जो मुंबईने अवघ्या ५ धावांनी गमावला. मुंबई हा सामना सहज जिंकत होती, पण लखनौचा वेगवान गोलंदाज मोहसीन खानने बाजी फिरवली आणि शेवटच्या षटकात केवळ पाच धावा खर्च करत आपल्या संघाला पाच धावांनी विजय मिळवून दिला. मुंबईला शेवटच्या षटकात केवळ 11 धावा करायच्या होत्या पण टीम डेव्हिड-कॅमेरून ग्रीन केवळ 5 धावा करू शकले. मुंबईच्या पराभवानंतर या दोन खेळाडूंवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत, मात्र येथे सामन्यातील पराभवाचे कारण रोहित शर्माचा निर्णय आहे.

 

आता तुम्ही विचार करत असाल की कर्णधार रोहित शर्माने 25 चेंडूत 37 धावांची खेळी केली. मग तो कसा बनला मुंबई इंडियन्सच्या पराभवाचे कारण. वास्तविक, रोहित शर्माने कर्णधार म्हणून एक धोरणात्मक चूक केली, ज्याचा फटका त्याच्या संघाला सहन करावा लागला.

 

कॅमन ग्रीनला लखनौविरुद्ध ७व्या क्रमांकावर पाठवले. या खेळाडूने 6 चेंडूत फक्त 4 धावा केल्या. 17.50 कोटी किमतीच्या खेळाडूकडून चांगली कामगिरी अपेक्षित होती. पण इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ग्रीन हा मॅच फिनिशर नाही. तो टॉप ऑर्डरचा फलंदाज आहे आणि क्रीजवर मोठे फटके खेळण्यापूर्वी त्याला थोडा वेळ लागतो. पण लखनौविरुद्ध रोहित शर्माने ग्रीनला विष्णू विनोदच्या खाली पाठवले.

 

तसे पाहता मुंबई संघ विजयाच्या अगदी जवळ होता. 19व्या षटकात टीम डेव्हिडच्या फटकेबाजीने मुंबईच्या विजयावर जवळपास शिक्कामोर्तब झाले. मुंबईला 2 षटकात 30 धावांची गरज होती. टीम डेव्हिडने नवीन-उल-हकच्या षटकात दोन षटकारांच्या जोरावर 19 धावा केल्या. यानंतर मुंबई शेवटच्या षटकात 11 धावा सहज करेल असा विश्वास वाटत होता. पण मोहसीन खानच्या यॉर्कर्सने टीम डेव्हिड आणि कॅमेरून ग्रीनला मोठे फटके खेळू दिले नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.