IPL 2024: “रोहित शर्मा मोठ्या मनाचा माणूस”.. हार्दिक पंड्या साठी रोहित शर्मा सोडणार मुंबईचे कर्णधारपद? आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये मोठी आदलाबदल..

 IPL 2024: "रोहित शर्मा मोठ्या मनाचा माणूस".. हार्दिक पंड्या साठी रोहित शर्मा सोडणार मुंबईचे कर्णधारपद? आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये मोठी आदलाबदल..

 IPL 2024: जेव्हापासून गुजरात टायटन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये परतला आहे (IPL 2024 TRADE), तेव्हापासून तो रोहित शर्माकडून कर्णधारपद स्वीकारणार असल्याची चर्चा आहे.

अशा परिस्थितीत भारतीय संघाचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन म्हणाला की, रोहित शर्मा मोठ्या मनाचा माणूस आहे. तो हा बदल चांगल्या प्रकारे हाताळेल. हार्दिक हा मुंबई इंडियन्सचा पुढचा कर्णधार असेल यावर विश्वास ठेवण्यास आपल्याला कोणतीही अडचण नसल्याचेही अश्विनने म्हटले आहे.

IPL 2024: मुंबई इंडियन्सवर जसप्रीत बूमराह नाराज? इंस्टावरील स्टोरीने चर्चांना उधान, समोर आले मोठे कारण...

 IPL 2024: हार्दिक साठी रोहित सोडणार कर्णधारपदावर पाणी?

टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू एस बद्रीनाथ यांच्यासोबत यूट्यूब चर्चेत अश्विन म्हणाला, “रोहित शर्मा हा एक मोठा मनाचा माणूस आहे. तो एक चांगला कर्णधारही आहे. जर हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार घोषित केले तर तो परिस्थिती अतिशय कृपापूर्वक हाताळेल.

हार्दिकबद्दल तो पुढे म्हणाला, “ज्यापर्यंत मी हार्दिक पांड्याला ओळखतो. मला वाटते की हे पाऊल मैलाचा दगड ठरेल.”

 IPL 2024: "रोहित शर्मा मोठ्या मनाचा माणूस".. हार्दिक पंड्या साठी रोहित शर्मा सोडणार मुंबईचे कर्णधारपद? आयपीएल 2024 आधी मुंबई इंडियन्समध्ये मोठी आदलाबदल..

हार्दिक पांड्या नुकताच गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्समध्ये सामील झाल्याची माहिती आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली, जीटीने आपल्या पदार्पणाच्या हंगामातच आयपीएलचे विजेतेपद पटकावले. याशिवाय पुढच्या मोसमातही तो सलग दुसऱ्यांदा फायनल खेळला, पण यावेळी त्याला विजय मिळवता आला नाही.


हेही वाचा:

पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी..

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *