आजपर्यंत एकाही भारतीय कर्णधाराला न जमलेला विक्रम रोहित शर्मा च्या नावी, कांगारू ला धूळ चारत शतक ठोकले.

प्रामुख्याने आपला राष्ट्रीय खेळ हा हॉकी आहे, परंतु हॉकी पेक्षा आपल्या देशात क्रिकेट ला जास्त पसंती आहे. देशातील सर्वाधिक लोक क्रिकेट खेळाचे वेडे आहेत. लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत क्रिकेट चे वेड हे सर्वाधिक आहे.

नागपूर कसोटी सामन्याचा दुसऱ्या दिवशी सुद्धा भारतीय संघाने आक्रमक फलंदाजी केली आहे . भारतीय संघातील उत्कृष्ठ आणि सर्वगुण अष्टपैलू व्यक्तिमत्त्व क्रिकेटपटू आणि आक्रमक फलंदाज रोहित शर्मा ने नागपूर कसोटी मधील दुसऱ्या दिवशी 100 धावा झळकावल्या आहेत.
नागपूर कसोटी सामन्याला रोहित शर्मा आणि आर आश्विन या दोन्ही खेळाडूंनी चांगलाच डाव रंगवला. तसेच आश्विन ला नाईट वॉचमन म्हणून सुद्धा ओळखले जाते. दुसऱ्या दीड उभा राहून सुद्धा आश्विन ची विकेट पडली. परंतु भारताचा आक्रमक फलंदाज रोहित शर्मा अजून क्रिस वर होता.
नागपूर कसोटी मध्ये दुसऱ्या दिवशी रोहित शर्मा ने आक्रमक खेळी करून आपले शतक ठोकण्याचा विक्रम केला आहे. काल जडेजा आणि आश्विन च्या गोलंदाजी मुळे भारताने कांगारूंच्या डाव 177 वर गुडळत पहिला विजय दिवस आपल्या नावावर केला.
आज नागपूर कसोटी मध्ये आश्विन आणि रोहित शर्मा ने दीड तास टिकून 104 चेंडूत 42 धावा काढल्या. परंतु नंतर आश्विन ची विकेट पडल्यावर मात्र रोहित शर्मा टिकून खेळू लागला.
रोहित शर्मा ने आपले शतक हे 171 चेंडूत 100 धावा काढून आपले शतक पूर्ण केले. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन म्हणून हे पहिलेच शतक रोहित शर्मा ने झळकावले आहे. क्रिकेट च्या तिन्ही फॉरमॅट मध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा एकमेव कर्णधार आहे.