मुंबई इंडियन्स कडून रोहित शर्माचे ‘द्विशतक,सचिन तेंडुलकर कडून भेट म्हणून मिळाली खास जर्सी..!

मुंबई इंडियन्स कडून रोहित शर्माचे 'द्विशतक,सचिन तेंडुलकर कडून भेट म्हणून मिळाली खास जर्सी..!

आयपीएल 2024च्या 8व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव केला. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात महत्त्वपूर्ण मॅच ठरली. या सामन्यात एक दोन नव्हे तर तब्बल 12 विक्रम रचले गेले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव झाला असला तरी रोहित शर्मासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. रोहित शर्मासाठी कालचा सामना मुंबई इंडियन्स संघाकडून खेळताना 200वा सामना होता. यासह रोहित एका नव्या विक्रमाच्या क्लबमध्ये सामील झाला.

रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाकडून 200 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला. सचिन तेंडुलकरने एक स्पेशल जर्सी भेट म्हणून दिली, ज्याच्यावर 200 असे लिहिले होते. ओव्हरऑल 200 सामने खेळणारा तो तिसरा खेळाडू ठरला आहे. विराट कोहली हा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाकडून 239 तर महेंद्रसिंग धोनी याने चेन्नई सुपर किंग्स संघाकडून 222 सामने खेळले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by playR (@playr.vip)

36 वर्षे रोहित शर्मा मुंबई मुंबई इंडियन्स संघाकडून 2013 पासून खेळतोय. त्यापूर्वी तो डेक्कन चाजर्स संघाकडून खेळत होता. 2013 ते 2023 या दहा वर्षाच्या कालावधीत तो मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता. दहा वर्षाच्या कारकीर्द त्याने पाच वेळा आयपीएल चषक जिंकून दिला. यासह रोहित मुंबईकडून 5 हजार धावा करणारा खेळाडू देखील बनला. रोहित नंतर वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याचे नाव आहे, ज्याने मुंबई इंडियन्स संघाकडून 189 सामने खेळलेत तर हरभजन सिंग यांनी 136 सामने खेळले होते.

रोहित शर्मा याने 158 सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व केले होते. त्यापैकी 87 सामन्यात विजय तर 67 सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. रोहित शर्मा हा महेंद्रसिंग धोनी नंतर सर्वात यशस्वी कर्णधार आहे. आयपीएल मध्ये दोनशेहून अधिक सामने खेळणारे तीनच खेळाडू आहेत. विशेष म्हणजे हे तिन्ही खेळाडू भारतीय खेळाडू आहेत. एकाही विदेशी खेळाडूने 200 सामने खेळले नाहीत.

मुंबई इंडियन्स कडून रोहित शर्माचे 'द्विशतक,सचिन तेंडुलकर कडून भेट म्हणून मिळाली खास जर्सी..!

यंदा हार्दिक पांड्या हा मुंबई इंडियन संघाचा कर्णधार आहे. रोहित पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळतोय. कोणतेही कारण न देता रोहित शर्मा यांच्याकडून मुंबई इंडियन्स संघाने कर्णधार पद काढून घेतले होते. रोहित रोहित शर्माकडून नेतृत्व पद काढून घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या लाखो चाहत्यांनी त्यांना ट्विटर वरून अनफॉलो केले. तसेच हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्सला सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले. सध्या संघाच्या वातावरणात काहीसा फरक जाणवत असल्याचे दिसून येते. हार्दिक पंड्याने रोहित शर्मा याला क्षेत्ररक्षण करतेवेळी सीमारेषाजवळ थांबवल्यामुळे चाहत्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली होती. यंदाच्या आयपीएल मध्ये रोहित कसा खेळतोय याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.


==

 

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *