Viral video: पहिला सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियंसने खेळली जोरदार धूळवड, रोहित शर्माचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral video: पहिला सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियंसने खेळली जोरदार धूळवड, रोहित शर्माचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

 

ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group

=======

Rohit Sharma playing Holi Viral Video: आज एकीकडे संपूर्ण देश होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करत आहे. भारतीय क्रिकेटपटूही होळीच्या रंगात रंगलेले दिसले. टीम इंडियाचा कर्णधार आणि मुंबई इंडियंसचा माजी कर्णधार रोहित शर्माही उत्साहात होळी खेळताना दिसला. रोहित शर्माचा होळी खेळतानाचा एक व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये रोहित शर्मा पाण्यासोबत होळी खेळताना दिसत आहे.

 

मुंबई इंडियन्सने व्हिडिओ केला शेअर .

रोहित शर्माचा होळी खेळतानाचा व्हिडिओ मुंबई इंडियंसने त्यांच्या X सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा खेळाडूंवर पाणी फेकताना दिसत आहे. मात्र, या व्हिडिओमध्येमुंबई इंडियंसचा कर्णधार हार्दिक पंड्या दिसत नाही. त्यानंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनात अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्यात अद्याप काहीही चांगले झालेले नाही, असे अनेक चाहत्यांना वाटते.

रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला मुंबई इंडियंसचा नवा कर्णधार बनवल्यापासून सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर हार्दिक पांड्याला दररोज ट्रोलर्स ट्रोल करत असतात. काल IPL 2024 मध्ये झालेल्या गुजरात टायटन्स आणिमुंबई इंडियंस यांच्यातील सामन्यात मुंबईचा पराभव झाल्यानंतरही हार्दिक पांड्याला प्रचंड ट्रोल करण्यात आले.

Viral video: पहिला सामना गमावल्यानंतर मुंबई इंडियंसने खेळली जोरदार धूळवड, रोहित शर्माचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

पहिल्या सामन्यात मुंबई इंडियंसचा पराभव झाला होता.

मुंबई इंडियन्सने IPL 2024 मध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली गुजरात टायटन्ससोबत सामना खेळून त्यांच्या मोहिमेची सुरुवात केली. पहिल्याच सामन्यात हार्दिक पंड्याच्या मुंबई इंडियन्सला 6 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते. या सामन्यात रोहित शर्माने 43 धावांची शानदार खेळी खेळली असली तरी हार्दिक पांड्या गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्हीत फ्लॉप ठरला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *