हिटमॅनने रचला विक्रमांचा पंजा.! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माच्या नावावर झाले ‘हे’ 5 मोठे विक्रम..

हिटमॅनने रचला विक्रमांचा पंजा.! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केले हे 5 मोठे विक्रम..

हिटमॅनने रचला विक्रमांचा पंजा.! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केले हे 5 मोठे विक्रम..


रोहित शर्मा: विश्वचषक 2023 (world cup 2023) मधील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध रोहित शर्मा (Rohit Sharma) स्वस्तात बाद झाल्याने चाहते निराश झाले होते, पण अफगाणिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध स्फोटक शतक झळकावून ‘हिटमॅन’ने त्याची भरपाई केली आह्हे. या  सामन्यादरम्यान रोहित  शर्माने शानदार शतकीय पारी खेळून आपला फोर्म दाखवून दिला आहे. त्याने आपल्या या स्फोटक खेळीमध्ये 84 चेंडूत 131 धावा केल्या.

दरम्यान, तो 155.95 च्या स्ट्राईक रेटने 131 धावांची शतकी खेळी खेळण्यात यशस्वी ठरला. या काळात त्याच्या बॅटमधून 16 चौकार आणि पाच उत्कृष्ट षटकार आले. या सामन्यादरम्यान त्याने अनेक खास विक्रमही केले आहेत, चला तर या विशेष बातमी मधून जाणून घेऊया अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने कोण कोणते विक्रम रचले आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने केलेले 5 विक्रम .

1.रोहित विश्वचषकात सर्वाधिक शतके करणारा पहिला फलंदाज ठरला:

रोहित शर्मा विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर हा विशेष विक्रम नोंदवला गेला होता. त्याने विश्वचषकात सहा शतके झळकावली होती. रोहितच्या नावावर आता सात शतके आहेत.

रोहित शर्मा
image courtesy- Insta-Rohit sharma

2.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा रोहित पहिला फलंदाज ठरला

एवढेच नाही तर रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला फलंदाज बनला आहे. या विशिष्ट बाबतीत त्याने वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेलला मागे टाकले आहे. गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 553 षटकार मारले आहेत. तर रोहितच्या नावावर ५५६ षटकार आहेत.

3.रोहित विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

रोहित शर्मा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय संघातील पहिला फलंदाज ठरला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरचा पराभव केला आहे. विश्वचषकात सचिनच्या बॅटमधून 27 षटकार मारले गेले. त्याने 28 षटकार मारले आहेत.

हिटमॅनने रचला विक्रमांचा पंजा.! अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नावावर केले हे 5 मोठे विक्रम..
image courtesy- Rohit sharma/ Twitter

4.रोहित विश्वचषकात सर्वात जलद १००० धावा करणारा फलंदाज ठरला:

रोहित शर्मा विश्वचषकात सर्वात जलद 1000 धावा करणारा संयुक्त पहिला फलंदाज ठरला आहे. शर्माने विश्वचषकात 19 डावात सर्वात जलद 1000 धावा करणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची बरोबरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी 19 डावात 1000 चा आकडा पार केला आहे.

5.रोहित विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारा पहिला भारतीय ठरला:

रोहित शर्मा विश्वचषकात सर्वात जलद शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्यांच्या आधी माजी कर्णधार कपिल देव यांच्या नावावर या विशेष कामगिरीची नोंद आहे. रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध 63 चेंडूत आपले शतक पूर्ण केले आहे.


PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..