Rohit Sharma Records: शून्यावर बाद होऊनही कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास… अंतरराष्ट्रीय क्रीकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू…

Rohit Sharma Records: शून्यावर बाद होऊनही कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास... अंतरराष्ट्रीय क्रीकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू...

Rohit Sharma Records: काल (14 जानेवारी)  रोजी भारत आणि अफगानिस्तान (IND vs AFG) यांच्यात तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदोरच्या होळकर स्टेडियमवर खेळवला गेला. टीम इंडियाने या सामन्यात अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करत सामन्यासोबतच मालिकाही जिंकली.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) एक खास कामगिरी आपल्या नावावर केली आहे. 150 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. यांनतर टीम इंडियाच्या कर्णधाराला अनेक दिग्गज खेळाडूंनी शुभेच्छा दिल्या. स्फोटक फलंदाज सूर्यकुमार यादवने रोहित शर्माला (Rohit Sharma) खूप खूप शुभेच्छा दिल्या. दुखापतीमुळे सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) या मालिकेत सहभागी होऊ शकलेला नाही. मात्र, त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून त्याने रोहित शर्माचे या विशेष कामगिरीबद्दल अभिनंदन केले.

आंतरराष्ट्रीय T20 फॉर्मेट मध्ये 150 सामने खेळणारा पहिला खेळाडू ठरला रोहित शर्मा(Rohit Sharma).

रोहित शर्मा (Rohit Sharma) हा पहिला खेळाडू आहे ज्याने आंतरराष्ट्रीय T20 फॉर्मेटमध्ये 150 सामने खेळले आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग आहे ज्याने 134 टी-20 सामने खेळले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर आयर्लंडचा जॉर्ज डॉकरेल आहे. त्याने आतापर्यंत 128 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. या यादीत चौथ्या स्थानावर पाकिस्तानचा शोएब मलिक आहे ज्याने 124 टी-20 सामने खेळले आहेत.

Rohit Sharma Records: शून्यावर बाद होऊनही कर्णधार रोहित शर्माने रचला इतिहास... अंतरराष्ट्रीय क्रीकेटमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला खेळाडू...

रोहित शर्माने आतापर्यंत 150 टी-20 सामन्यांमध्ये 31 पेक्षा जास्त सरासरीने 3853 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचाही समावेश आहे. रोहित शर्माचे कर्णधारपदही चांगले राहिले असून त्याने 53 टी-20 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करताना 40 सामने जिंकले आहेत.

भारतीने संघाने दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेमध्ये 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना बंगलोरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर 17 जानेवारी रोजी खेळवला जाणार आहे.


हेही वाचा:

विराट कोहलीला भेटण्यासाठी सुरक्षा तोडून मैदानात आलेला चाहता अडचणीत, आता जावे लागणार थेट तुरुंगात, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Viral Video: शिवम दुबे ने ठोकले एवढे जबरदस्त षटकार की, कर्णधार रोहित शर्माआणि विराट कोहलीही झाले चकित, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *