क्रीडाताज्या घडमोडी

“एक शेर तर दुसरा बब्बर शेर” शुभमन गिल- रोहित शर्माने ठोकले शानदार शतके, न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुरळा उडवत ठोकल्या तब्बल एवढ्या धावा….!

“एक शेर तर दुसरा बब्बर शेर” शुभमन- रोहितने ठोकले शानदार शतके,न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा धुरळा उडवत ठोकल्या तब्बल एवढ्या धावा….!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन एक दिवशीय सामन्याच्या मालिकेतील शेवटचा सामना आज इंदोर येथील होळकर मैदानावर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून न्यूझीलंडच्या कर्णधाराने टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रन दिले आणि भारतीय संघाच्या सलामीवीरांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा पार सुपडा साफ केला.

शुभमन गिल

भारतीय डावाची सुरवात करण्यास आलेले कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी जबदरस्त फलंदाजी करत जवळपास 27 षटके फलंदाजी केली. यादरम्यान या दोघांनीही आपापले शतके साजरी केली. कर्णधार रोहित शर्माने 85 चेंडू खेळत 101 धावा केल्या तर सलामीवीर शुभमन गिलने सुद्धा 78 चेंडूंचा सामना करत शानदार 112 धावा काढल्या.

या दोघांच्या तुफानी फलंदाजीमुळे भारतीय संघाची धावसंख्या अवघ्या 25 षटकातचं 200 पार पोहचली. कर्णधार रोहित शर्माने आपल्या या शतकीय खेळीमध्ये 9 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार ठोकले. तर दुसरीकडे शुभमनने 13 चौकार आणि 5 षटकार ठोकलेत.

कर्णधार रोहित शर्माला मिचेल ब्रेसवेलने बोल्ड केले तर दुसरीकडे गिल कोनवेच्या हाती झेल देऊन पव्हेलीयनमध्ये परतला. सलामी जोडी पव्हेलियनमध्ये पोहचली तेव्हा भारतीय संघाची धावसंख्या 230 अशी होती.

सोशल मिडीयावर रोहित- गिल ट्रेंड..

 

हे ही वाचा..

क्रिकेटर ‘मोहम्मद शमी’ला मोठा धक्का…! बायकोविरोधातील केसचा निकाल शमी विरोधात.. आता पत्नीला दरमहा एवढी रक्कम ‘पोटगी’ म्हणून द्यावी लागणार ..

धोनी अन् विराटला मागे सोडत रोहित शर्मा ठरलाय ‘बॉस’, ‘या’ बाबती केलाय वर्ल्ड रेकॉर्ड!

अखेर केएल राहुल झाला शेट्टी कुटुंबाचा जावई! लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button