हिटमॅन चमकला..! शानदार शतक ठोकत ‘रोहित शर्मा’ने मोडले अनेक विक्रम, कपिल देव सह सचिन तेंडूलकरला देखील सोडले मागे..
भारतीय कर्णधार रोहित शर्माने अफगाणिस्तानविरुद्ध अवघ्या 63 चेंडूत शतक झळकावून इतिहास रचला आहे. अशाप्रकारे, रोहित शर्मा एकदिवसीय विश्वचषक सामन्यांमध्ये भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. याआधी, एकदिवसीय विश्वचषकात भारतासाठी सर्वात कमी चेंडूंवर शतक ठोकण्याचा विक्रम कपिल देव यांच्या नावावर होता. कपिल देवने 72 चेंडूत शतक झळकावले होते, मात्र आता रोहित शर्माने हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
रोहित शर्मानेमोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम.
रोहित शर्माचे विश्वचषकातील हे सातवे शतक आहे. या बाबतीत आता रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आहे. यापूर्वी भारताकडून विश्वचषकात सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. विश्वचषकात सचिन तेंडुलकरच्या नावावर ६ शतके आहेत. 2015 च्या विश्वचषक स्पर्धेत रोहित शर्मा पहिल्यांदा खेळला होता. या विश्वचषकात रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध शानदार शतक झळकावले होते. यानंतर रोहित शर्माने वर्ल्ड कप 2019 मध्ये 5 शतके झळकावली. कालच्या सामन्यातील शतक पकडून अशाप्रकारे एकदिवसीय विश्वचषकाचे सातवे शतक ठोकले आहे.
रोहित शर्मा ठरला विश्वचषक स्पर्धेत सर्वांत तेज शतक ठोकणारा भारतीय खेळाडू.
याआधी कपिल देव यांनी 1983 च्या विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्ध 72 चेंडूत शतक ठोकले होते. हे भारताचे विश्वचषकातील सर्वात वेगवान शतक ठरले होते, मात्र आता रोहित शर्माने कपिल देवला मागे टाकले आहे. रोहितने अफगाणिस्तानविरुद्ध 84 चेंडूत 131 धावा काढल्या. या खेळीसह रोहितने कपिल देव यांना मागे सोडत सर्वांत तेज शतक ठोकणारा भारतीय खेळाडू होण्याचा मान मिळवला.
अफगाणिस्तानवर भारतीय संघाचा मोठा विजय.
भारत-अफगाणिस्तान सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, टीम इंडियासमोर विजयासाठी २७३ धावांचे लक्ष्य होते. भारतीय कर्णधार रोहित शर्माची शानदार शतकीय खेळी आणि विराट कोहलीचे अर्धशतक यांच्या जोरावर भारतीय संघाने हा सामना 35 षटकामध्ये जिंकत अफगाणिस्तान वर मोठा विजय मिळवला.
PAK vs NED : आकडेवारीनुसार पाकिस्तान पडलाय नेदरलँड्सवर भारी, आजपर्यंत एकाही सामन्यात नाही झाला पाकिस्तानचा पराभव, बाबर आझम या 11खेळाडूंना देऊ शकतो संधी..