क्रीडा

ठरलं तर ‘या’ दिवशी होणार जसप्रीत बुमराहचे पुनरागमन! स्वतः रोहित शर्माने केला खुलासा..

rohit sharma statement on jasprit bumrah comeback

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) गेल्या काही महिन्यांपासून दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा प्रमुख असल्यामुळे जसप्रीत बुमराहने लवकरात लवकर पुनरागमन करावं अशी इच्छा क्रिकेट चाहत्यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान न्यूझीलंड विरुद्धची वनडे मालिका झाल्यानंतर, आता कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनाबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

जसप्रीत बुमराह सप्टेंबर २०२२ पासून संघाबाहेर आहे. पाठीच्या दुखण्यामुळे त्याला टी -२० विश्वचषक स्पर्धेतून देखील माघार घ्यावी लागली होती. श्रीलंकेविरुद्ध झालेल्या मालिकेपूर्वी तो पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला होता. मात्र पुन्हा दुखापतग्रस्त झाल्याने त्याला संघाबाहेर करण्यात आले होते. आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, तो ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या शेवटच्या २ कसोटी सामन्यांमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. ऑस्ट्रेलिया विरुध्द होणारा तिसरा कसोटी सामना १ मार्च ते ५ मार्च दरम्यान पार पडणार आहे. त्यामुळे १ मार्च रोजी जसप्रीत बुमराहचे पुनरागमन होऊ शकते.

कर्णधार रोहित शर्माने देखील म्हटले आहे की, तो ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील शेवटच्या २ सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो. तिसरा वनडे सामना झाल्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना रोहित शर्माने म्हटले की, ” जसप्रीत बुमराह बाबत मी खात्रीशीरपणे काहीच बोलू शकत नाही. मी अशी आशा व्यक्त करतोय की, तो ऑस्ट्रेलिया विरुध्द होणाऱ्या शेवटच्या २ कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध राहिला पाहिजे. आम्हाला रिस्क घ्यायची नाहीये. कारण पाठीचं दुखणं हे खूप गंभीर असतं. त्यानंतर देखील आम्हाला भरपूर क्रिकेट खेळायचे आहे. आम्ही एनसीएतील फिजिओ आणि डॉक्टर्सच्या संपर्कात आहोत.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button