रोहित शर्मा: श्रीलंका आणि भारत (IND vs SL) यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील शेवटचा सामना बुधवारी खेळला गेला, ज्यामध्ये यजमान श्रीलंकेने 110 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. यासह त्यांनी मालिका 2-0 अशी जिंकली. गेल्या २७ वर्षांतील श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा पहिला वनडे मालिका पराभव आहे. मात्र असे असतानाही कर्णधार रोहित शर्माने आपल्या खेळाडूंचे खूप कौतुक केले. मालिका संपल्यानंतर तो काय म्हणाला जाणून घेऊया..
काय म्हणाला रोहित शर्मा?
श्रीलंकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्माने सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान सांगितले की, या मालिकेत टीम इंडियाची फलंदाजी ही चिंतेची बाब नाही. रोहित म्हणाला,
“आम्ही ज्याप्रकारे फिरकी खेळलो ते आमच्यासाठी चिंतेचे आहे असे मला वाटत नाही, परंतु आम्ही गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे आणि तो आमचा वैयक्तिक गेमप्लॅन आहे. “या मालिकेत निश्चितपणे आमच्यावर दबाव आणणारी ही गोष्ट आहे.”
“T20 विश्वचषक जिंकल्यानंतर आम्ही हलगर्जी झालो असे नाही. हा एक विनोद आहे. जेव्हा तुम्ही भारताकडून खेळत असता तेव्हा कोणतीही हलगर्जीपणा नसतो. “श्रीलंका आमच्यापेक्षा चांगली खेळली याचे श्रेय त्यांना इथे द्यावे लागेल.”
एक सिरीज गमावल्यामुळे जग संपलेले नाही – रोहित शर्मा
रोहित शर्माने आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले आहे की, टीम इंडियाचे खेळाडू गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगले खेळत आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी एखादी मालिका गमावली तर, जगाचा अंत होणार नाही.
“आम्ही संपूर्ण मालिकेत चांगले क्रिकेट खेळलो नाही आणि म्हणूनच आज आम्ही येथे उभे आहोत. एकूणच, काही सकारात्मक गोष्टी होत्या. फिरकीपटूंनी कशी गोलंदाजी केली, मधल्या काही फलंदाजांनीही चांगली कामगिरी केली. आम्ही मालिका गमावली आणि मला वाटते की आम्हाला सकारात्मक पैलूंऐवजी इतर अनेक क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ”
“आम्हाला परत जावे लागेल आणि अशा परिस्थितीचा सामना करताना आम्हाला काय करावे लागेल ते पहावे लागेल. मालिका गमावणे म्हणजे जगाचा अंत होत नाही. गेल्या काही वर्षांत हे खेळाडू चांगले खेळत आहेत. तुम्ही मालिका देखील गमावू शकता.”
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत 50 षटकात 248/7 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची तारांबळ उडाली. 26.1 षटकात अवघ्या 138 धावा करून ते सर्वबाद झाले. निळ्या जर्सी संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 20 चेंडूत 35 धावांची खेळी खेळली.
हेही वाचा:
- IND Vs SL 2th ODI Live:जेफ्री वँडरसेसने रचला इतिहास,एक दोन नाही तर भारताचे तब्बल एवढे खेळाडू केले बाद..
- ind vs sl Rohit sharma injured: तिसऱ्या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का, कर्णधार रोहित शर्मा सरावादरम्यान जखमी, आज खेळू शकणार की नाही?