World Cup 2023: ‘विश्वचषकात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट’ वर्ल्डकपच्या एकदिवस आधी रोहित शर्माने देशाबद्दल केले मोठे वक्तव्य..
वर्ल्ड कप 2023 सुरू होण्याच्या एक दिवस आधी, म्हणजे आज (4 ऑक्टोबर) दुपारी, सर्व 10 संघांचे कर्णधार अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर एकत्र आले होते . या कार्यक्रमाला ‘कॅप्टन डे’ असे नाव देण्यात आले. या कार्यक्रमात रवी शास्त्री आणि इऑन मॉर्गन यांनी सर्व कर्णधारांशी त्यांच्या विश्वचषकाच्या तयारीबद्दल चर्चा केली. यावेळी रोहित शर्माशी चर्चा केली असता त्याने टीम इंडियाच्या तयारीचे वर्णन केले. भारतातील लोक सर्व संघांवर प्रेम करतील आणि स्पर्धेदरम्यान सर्व स्टेडियम भरून जातील असेही यावेळी रोहित म्हणाला.
रोहित शर्मा म्हणाला, ‘विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधारपद भूषवणं ही अभिमानाची गोष्ट आहे. मी खूप उत्साही आहे. दबाव देखील खूप आहे. स्पर्धा भारतातील असो की भारताबाहेर, नेहमीच दडपण असते. हा विश्वचषक कठीण असेल, पण आम्ही पूर्णपणे तयार आहोत. आम्ही खूप मेहनत घेतली आहे. यजमान संघाने मागील तीन विश्वचषक जिंकले आहेत, मात्र एकावेळी एकाच सामन्यावर लक्ष केंद्रित करून आम्ही या स्पर्धेत पुढे जाऊ. विश्वचषकात प्रत्येक संघ आपली पूर्ण ताकद देतो. आपल्यालाही तेच करावे लागेल. आम्हाला आमच्या खेळाची पातळी उंच ठेवायची आहे. पहिले दोन सामने खूप खास असतील. हे गती निश्चित करेल.
‘सर्व सामन्यांसाठी स्टेडियम्स प्रेक्षकांनी भरतील- रोहित शर्मा
यादरम्यान रोहित शर्माने सर्व संघांच्या कर्णधारांनाही संबोधित केले. तो म्हणाला, ‘येथे बसलेल्या सर्व कर्णधारांना आपल्या देशासाठी काहीतरी साध्य करायचे आहे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. मी एक गोष्ट सांगू इच्छितो की, भारतातील लोकांना क्रिकेट खूप आवडते. सर्व संघांना भारतात भरभरून प्रेम मिळेल आणि प्रत्येक सामन्यात स्टेडियम खचाखच भरलेले असतील.
यादरम्यान रोहितला भारताचा सराव सामना रद्द करण्याबाबत प्रश्नही विचारण्यात आला होता. यावर रोहित म्हणाला, ‘सराव सामना रद्द झाल्याने फारसे नुकसान झाले नाही. आम्ही अलीकडे बरेच सामने खेळलो. त्यामुळे एक सराव सामना रद्द झाल्यामुळे आमच्या तयारीत फारसा असा काही प्रभाव पडणार नाही. आम्ही सर्व पद्धतीने तयार आहोत. आणि या विश्वचषकात चांगली कामगिरी करण्याचे आमचे माणस आहे..
हेही वाचा: