‘भारत नाही तर हा देश आहे रोहित शर्माचा आवडता देश”; स्वतः दिली कबुली, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..
भारत आणि ऑस्ट्रोलीया यांच्यात सध्या 3एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे.पहिला सामना टीम इंडियाने जिंकून सिरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली आहे.तर दुसरा सामना आज खेळवला जाणार आहे. टीम इंडियाचे प्रमुख खेळाडू या सिरीजमधील दोन्ही सामन्यासाठी उपलब्ध नाहीयेत. यामध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा सुद्धा आहे.
रोहित सध्या मैदानातून दूर आपल्या परिवारासोबत सुट्टीचा आनंद घेत आहे.यादरम्यान आता रोहित शर्माचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यात रोहित देशाविषयी आपले मत मांडताना दिसत आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अनेकदा त्याच्या स्पष्ट बोलण्याच्या शैलीसाठी ओळखला जातो. चाहत्यांनाही त्याचीबोलण्याची शैली खूप आवडते. भारताने आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) जिंकल्यानंतर, रोहित शर्माला ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणार्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. मात्र, त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने सर्वांत आवडता देश म्हणून भारताचा नाही तर इतर देशाचा उल्लेख केला आहे.
भारत नाही तर हा देश आहे रोहित शर्माचा आवडता देश.
रोहित शर्माने अलीकडेच क्रीडा पत्रकार विमल कुमार (Vimal Kumar) यांना एक मुलाखत दिली आहे, ज्यामध्ये रोहित शर्माला विचारण्यात आले की, तुम्ही क्रिकेटसाठी कोणता देश प्रवास केला आहे आणि तुम्हाला तो खूप आवडतो. यावर प्रतिक्रिया देताना रोहित शर्माने लंडन आणि दुबई हे आपले आवडते देश असल्याचे सांगितले. लंडन आणि दुबई हे त्याचे आवडते देश असल्याचे त्याने कबूल केले. यामागची कारणे देतांना रोहित म्हणाला की, या देशांमध्ये सर्व काही सहज उपलब्ध आहे. याशिवाय त्याची मुलगी समायरा हिलाही हा देश खूप आवडतो.
माझे वडील माझ्यासाठी ‘हिरो’- रोहित शर्मा
रोहित शर्माने आपल्या मुलाखतीत वडिलांना ‘हिरो’ म्हटले होते. हिटमॅनचा असा विश्वास आहे की, त्याच्या वडिलांनी त्याला खूप कष्टाने वाढवले, ज्यासाठी त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. तो म्हणाला की,आमच्या लहानपणी माझ्या वडिलांनी खूप संघर्ष केला. माझ्या वडिलांना कसोटी क्रिकेट खूप आवडते, जेव्हा मी भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा त्यांनी मला दिवसातून दोनदा फोन केला. मी बराच वेळ त्यांच्याशी बोललो या सामन्यात मी शतकही केले.
पहा व्हायरल व्हिडीओ.
IND vs AUS :रोहित शर्मा तिसऱ्या सामन्यात होणार सहभागी
भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध (IND vs AUS) खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माचे पुनरागमन होणार आहे. यानंतर टीम इंडिया त्याच्या नेतृत्वाखाली 2023 च्या विश्वचषकाची (World Cup 2023) तयारी सुरू करेल, जी 5 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. यावेळी चाहत्यांना रोहितकडून २०२३ च्या विश्वचषकात मोठ्या अपेक्षा आहेत. हिटमॅनच्या नेतृत्वाखाली १२ वर्षांनंतर भारताला विश्वविजेते बनताना पाहायचे आहे.
हेही वाचा:
शुभमन गिल सारा पुन्हा पडले एकमेकांच्या प्रेमात?.. ब्रेकअप नंतर दोघेही पुन्हा एकत्र, फोटो व्हायरल..