आयपीएल २०२३ स्पर्धेत रोहित करणार धमाका! दिग्गजाने केली भविष्यवाणी ..

येत्या काही दिवसात आयपीएल २०२३ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी जोरदार सराव करायला देखील सुरुवात केली आहे. गतवर्षी मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेत हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तसेच कर्णधार रोहित शर्मा देखील पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. दरम्यान आता माजी भारतीय फलंदाजाने रोहितच्या फलंदाजीबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
गतवर्षी झालेल्या आयपीएल स्पर्धेत रोहित शर्मा फ्लॉप ठरला होता. त्याने १४ सामन्यांमध्ये २० पेक्षाही कमीच्या सरासरीने २६८ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याला एकही अर्धशतक झळकावता आले नव्हते. इतकेच नव्हे तर मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएल स्पर्धेच्या गुणतालिकेत तळाशी होता.
मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्याने जोरदार कामगिरी केली आहे. त्यामुळे माजी भारतीय कर्णधार सुनील गावस्कर यांनी असा अंदाज व्यक्त केला आहे की, तो या हंगामात चांगली कामगिरी करू शकतो.
रोहित शर्मा बाबत बोलताना सुनील गावस्कर यांनी म्हटले की,” नक्कीच जोफ्रा आर्चर हा मुंबई इंडियन्स संघासाठी ट्रंपकार्ड ठरणार आहे. तर दुहेरी शतक झळकावणाऱ्या ईशान कडूनही सर्वांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. मला असं वाटतं की, रोहित शर्मा नक्कीच यावेळी काहीतरी खास करेल..”