Rohit Sharma’s Diet Plan: वडापाव-बिर्याणी नव्हे तर ब्राऊन राईस खाऊन गोलंदाजांची धुलाई करतोय भारतीय कर्णधार.

T20 World Cup 2024: रोहित शर्मा नाही तर 'हा' खेळाडू टी-२० विश्वचषकात सांभाळणार टीम इंडियाची कमान, रोहित कडून पुन्हा हिसकावले जाणार कर्णधारपद..

 

Rohit Sharma’s Diet Plan: गेल्या काही वर्षापासून भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू शरीर स्वास्थ्याबद्दल जागरूक झालेले दिसतात. हे संघ स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगले लक्षण आहे. विराट कोहलीचे संघात आगमन झाल्यानंतर प्रत्येक खेळाडूंनी आपल्या फिटनेसवर लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यापैकीचा एक खेळाडू म्हणजे कर्णधार रोहित शर्मा. मोठमोठी खेळी करण्यात माहीर असलेला हा प्रतिभावान खेळाडू फिटनेस आणि डाएट प्लान स्ट्रिक्टली फॉलो करतो.

जागतिक क्रिकेटमध्ये रोज नवनव्या विक्रमांना गवसणी घालणारा हिटमॅन रोहित शर्माचा फिटनेस फंडा (Rohit Sharma’s Diet Plan) आणि डाएट प्लान याची माहिती आज आपण पाहणार आहोत. रोहित (Rohit Sharma) विटामिन, कॅल्शियम आणि प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश आपल्या डाएटप्लान मध्ये करतो, जेणेकरून त्याला मैदानावर जास्त एनर्जी मिळू शकेल. सध्या सुरु असलेल्या विश्वचषकामध्ये (Worldcup 2023) देखील त्याने आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये देखील बदल केला आहे.

असा आहे रोहित शर्माचा डायट प्लान (Rohit Sharma's Diet Plan)

असा आहे रोहित शर्माचा डायट प्लान (Rohit Sharma’s Diet Plan)

रोहित शर्माचे कुटुंब हे शाकाहारी असले तरी तो पूर्वी सकाळच्या नाश्त्यासाठी 25 अंडी खायचा. आता तो सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन शेक, दूध आणि ओट्सचे सेवन करतो. रोज सकाळी ताज्या फळांचा ज्यूस प्यायला त्याला खूप आवडते. दुपारच्या जेवणामध्ये तो ब्राऊन राईस, नाचणीची भाकर, ग्रिल्ड फिश, हिरव्या पालेभाज्याचे तो सेवन करतोय. ब्राऊन राईस शिवाय त्याला कधी कधी दाल चावल आणि सॅलेड देखील खायला खूप आवडते. संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तो ताजे फळे खातो.

रोहित शर्माच्या रात्रीच्या जेवणाची वेळ ही रात्री ठीक आठ वाजताची आहे. तो पचण्यासाठी हलके असलेले अन्नपदार्थ खाण्यास पसंत करतो. रात्रीच्या जेवणात चिकनचा समावेश असतो. मुळात तो मुंबईचा रहिवासी असल्यामुळे अर्थातच त्याला वडापाव खाण्याची प्रचंड आवड आहे. हैदराबादी बिर्याणी देखील त्याची आवडती डिश आहे.

AUS vs SL: ऑस्ट्रोलीयाची दमदार कामगिरी

रोहितचा जिम मधला वर्कआउट (Rohit Sharma Gym Workout)

रोहित पर्सनल जिम ट्रेनर च्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करीत असतो, ज्यामध्ये क्रंचेज, लेग राइज आणि कोर्स पुशअप्स वर जास्त भर देतो. जिममध्ये वर्कआउट केल्यानंतर तो स्विमिंग आणि सायकलिंग देखील करत असतो. रोहितचा मुंबईचा रणजी संघातील अभिषेक नायर याने फिटनेस मधील बरेच बारकावे सांगितले आहेत. जिममध्ये वर्कआउट करत असतानाचे अनेक व्हिडिओ त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकले आहेत.

ब्राऊन राईस चे फायदे (Benefits of Brown Rice)

  • पांढरे तांदूळ खाल्ल्याने वेट गेन होते, तर ब्राऊन राईस खाल्ल्यामुळे वेट नियंत्रणात राहते.

  • ब्राऊन राईस हृदयरोगापासून बचाव करतो.

  • ब्राऊन राईसमध्ये फायबर आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे ब्लड शुगर आणि ब्लड प्रेशर वाढण्याचा धोका कमी होतो म्हणून  रोहित ब्राऊन शुगर खाण्यावर जास्त भर देतो.