ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
काल (11 एप्रिल) झालेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी सामन्यात मुंबई इंडियन्स स्टार सलामीचा फलंदाज रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेल्या रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये 100 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. मुंबई इंडियन्सने गुरुवारी आयपीएल 2024 मधील 25 व्या षटकात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु विरुद्धच्या सामन्यात हा पराक्रम केला.
वानखेडे वर 100 षटकार ठोकणारा रोहित शर्मा ठरला पहिला खेळाडू..
मुंबई इंडियन्सचा संघ वानखेडे स्टेडियमवर आरसीबी कडून मिळालेल्या 197 धावांचा पाठलाग करत असताना रोहित शर्मा आणि ईशान किशन यांनी धुवाधार फलंदाजीला सुरुवात केली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी रचली ईशान किशन 69 धावा काढून आक्रमक फलंदाजी करण्याच्या नादात बाद झाला.
रोहित शर्माने विजयकुमारच्या सातव्या शतकातील चौथ्या चेंडूवर डीप मिडविकेटवर शंभरावा षटकार ठोकला मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने वानखेडे स्टेडियमवर 82 सामन्यांमध्ये एकूण शंभर षटकार ठोकले आहेत. वानखेडे स्टेडियमवर क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत रोहित शर्मा नंतर वेस्टइंडीज चा कायरन पोलार्ड हा दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स च्या माजी खेळाडू ने 61 सामन्यात 91 षटकार ठोकले आहेत तर ,भारताचा माजी फलंदाज अंबाती रायडू याने 62 सामन्यात 48 षटकार ठोकून तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे.
रोहित शर्माने ठोकले T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार..
रोहित शर्मा T20 क्रिकेटमध्ये 500 षटकार पूर्ण करण्यासाठी तीन षटकारांची गरज होती. कालच्या सामन्यात त्याने हा देखील विक्रम पूर्ण केला. T20 क्रिकेट मध्ये 500 षटकार ठोकणारा हा जगातला पाचवा क्रिकेटर बनला आहे. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 597 षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्मा (38) आणि ईशान किशन (69) यांच्यानंतर सूर्यकुमार यादवने देखील 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. मुंबई इंडियन्स ने गुरुवारी आरसीबीचा 27 चेंडू आणि सात गडी राखून पराभव केला. आरसीबीने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात आठ बाद 196 धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात मुंबई इंडियन्सने 15.3 षटकात तीन गडी गमावून हे लक्ष पार केले. (Rohit Sharma’s records at Wankhede stadium Mumbai)
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.