नेदरलँड्सविरुद्ध अर्धशतक ठोकताच कर्णधार रोहित शर्माच्या नावावर झाले हे मोठे विक्रम, असी कामगिरी करणारा ठरला दुसरा फलंदाज..
भारतीय कर्णधार रोहित शर्माने गुरुवारी (२७ ऑक्टोबर) सिडनीमध्ये नेदरलँड्सविरुद्ध झंझावाती अर्धशतक झळकावले. मात्र, गेल्या सामन्यात पाकिस्तानविरुद्ध रोहित स्वस्तात बाद झाला. त्यामुळे त्याला चाहत्यांच्या टीकेला सामोरे जावे लागले. मात्र या सामन्याची भरपाई करताना त्याने अर्धशतक झळकावून अनेक खास विक्रम केले आहेत. यासोबतच सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत हिटमॅनने युवराज सिंगलाही मागे टाकले आहे.
अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा दुसरा फलंदाज ठरला
रोहित शर्माने नेदरलँड्सविरुद्ध सिडनीमध्ये ५३ धावांची शानदार इनिंग खेळली होती. त्याने 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. यादरम्यान त्याच्या बॅटमध्ये 3 षटकार आणि 4 चौकार दिसले. या खेळीसह रोहित शर्मा टी-20 मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. त्याने एकूण 9 अर्धशतके केली आहेत. तर किंग कोहली १२ अर्धशतकांसह पहिल्या स्थानावर आहे. तर ख्रिस गेल तिसऱ्या आणि जयवर्धने चौथ्या स्थानावर आहे.

रोहित शर्माने युवराज सिंगचा विक्रम मोडला
T20 विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या इनिंगमध्ये 34 षटकार आहेत. तर युवराज सिंगच्या नावावर ३३ षटकार होते. त्याचा विक्रम मोडत रोहितने युवीला मागे टाकले आहे. या विश्वचषकात रोहितच्या बॅटने गर्जना केली तर हा आकडा आणखी वाढू शकतो.
Most 50+ Scores in T20 WC
12 – Virat Kohli*
9 – Rohit Sharma*
9 – Chris Gayle
7 – Jayawardene
6 – Warner
6 – Dilshan#ViratKohli#RohitSharma— saurabh sharma (@cntact2saurabh) October 27, 2022
सलामीवीर म्हणून सुनील गावसकर आघाडीवर आहेत
रोहित शर्मा बऱ्याच दिवसांपासून टीम इंडियासाठी ओपनिंग करत आहे. या सामन्यात त्याने केएल राहुलसोबत ओपनिंगमध्ये एक खास विक्रम केला आहे.ओपनर म्हणून भारतासाठी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा रोहित तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्या आता 12274 धावा झाल्या आहेत. त्याने या बाबतीत सुनील गावसकरला मागे टाकले आहे, ज्यांनी भारतासाठी सलामीवीर म्हणून १२२५८ धावा केल्या.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.