IND vsBNG: दुसऱ्या एकदिवशीय सामन्यात भारतीय संघाचा हा स्टार खेळाडू झाला जबर जखमी, संपूर्ण मालिकेतून होऊ शकतो बाहेर..
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना शेरे बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा नाणेफेक हरला. बांगलादेशचा कर्णधार लिटन दासने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
टीम इंडिया संघात दोन बदल करून गोलंदाजी करायला आली पण डावाच्या दुसऱ्याच षटकातच एक वाईट घटना घडली. संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने मैदानाबाहेर गेला आहे. पकडण्याचा प्रयत्न करत असताना त्याच्या हाताला दुखापत होऊन तो मैदानाबाहेर गेला.

नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी आला. चहरने पहिल्याच षटकात चांगली कामगिरी केली. त्याच दुसऱ्या षटकात रोहित शर्मा स्लिपमध्ये झेल घेताना जखमी झाला. त्यांच्या बोटाला गंभीर दुखापत झाली.
त्याच्या बोटातूनही रक्त येत होते. दुखापतीमुळे भारतीय कर्णधारही मालिकेतून बाहेर जाऊ शकतो, असे मानले जात आहे. त्याचवेळी रोहितच्या दुखापतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
pic.twitter.com/SoOLqQYLn1#RohitSharma
— Shivam Rajvanshi (@social_timepass) December 7, 2022
भारत: रोहित शर्मा (क), शिखर धवन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद/अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, दीपक चहर, मोहम्मद सिराज, कुलदीप सेन
बांगलादेश : लिटन दास (क), अनामूल हक, नजमुल हुसेन शांतो, शाकिब अल हसन, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), महमुदुल्लाह, अफिफ हुसैन, मेहदी हसन मिराज, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, इबादोत हुसेन