इंग्लंडकरून मानहानीकारक पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मा घेणार हा मोठा निर्णय, पराभवाची संपूर्ण जीमेद्दरी घेतली आपल्या खांद्यावर..
भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यान झालेल्या दुसर्या सेमीफायनल सामन्यात इंग्लंडने भारतीय संघाचा १० गडी राखून पराभव केला आहे. ज्यासोबतच भारतीय संघाचे विश्व चषक २०२२ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. पहिल्यांदा फलंदाजी करतांना भारतीय संघाने हार्दिक पंड्या आणि विरत कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर २० षटकात १६८ धावा बनवून इंग्लंडसमोर विजयासाठी १६९ धावांचे लक्ष ठेवले होते.
या लक्षाचा पाठलाग करतांना इंग्लंड कडून सलामीवीर जॉस बटलर आणि हेल्स या दोघांनीही तुफानी फलंदाजी करत इंग्लंडला एकहाती समना जिंकून दिला. भारतीय गोलंदाजांची कामगिरी एवढी खराब होती कि संपूर्ण सामन्यात ते एकसुद्धा फलंदाज बाद करु शकले नाही. या विजयासोबतच इंग्लंड संघ आता अंतिम सामन्यास पात्र ठरला आहे.
टी-२० २०२२ विश्वचषकाचा अंतिम सामना हा आता १३ नोव्हेबरला होणार असून तो पाकिस्तान आणि इंग्लंड या दोन संघात असेल. हा सामना जो जिंकले तो संघ वर्ल्डकप २०२२ चा विजेता ठरणार आहे..

भारतीय संघाच्या हरण्यामागे होती ही मोठी कारणे.
दुसरया सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाचा इंग्लंडने एकहातीपराभव केला आणि पुन्हा भारतीय संघांची नाचक्की झाले. भारतीय संघाच्या गोलंदाजाना अपयश आल्यामुळे हा सामना हातातून गेल्याचे बोलले जात असले तरीही स संघाच्या पराभवाला फलंदाज सुद्धा तेवढेच जबाबदर आहे. महत्वाचे म्हणजे या खेळपट्टीवर कमीतकमी २०० धावा काढणे अत्यंत गरजेचे होते. अंतर कर्णधार रोहित शर्मा, केएल. राहुल. रिषभ पंत सुर्यकुमार यादव हे सर्वच फलंदाज धावा काढण्यात अपयशी ठरले परिणामी इंग्लंडसमोर अगदी छोटी धावसंख्या भारतीय संघाने उभी केली. हि धावसंख्या सहज पार करत इंग्लंडने फायनलमध्ये धडक मारली..
View this post on Instagram
पराभवानंतर काय म्हणाला रोहित शर्मा?
इंग्लंड करून मानहानीकारक पराभव झाल्यानंतर प्रेझेंटेशन मध्ये कर्णधार रोहित शर्माला काही पराष्ण विचारण्यात आले तेव्हा बोलताना रोहित म्हणाला कि, निच्छितच या पराभवामुळे खूपच दुखी झालो आहे. आम्ही काही धावा काढण्यात कमी पडलो, तर आमच्या गोलंदाजाना सुद्धा इंग्लंडच्या सलामीवीरांना रोखण्यात अपयश आले. एकंदरीत काय तर संपूर्ण सामन्यात आम्ही कोणत्याही क्षेत्रात चांगळी कामगिरी करू शकलो नाही, म्हणून आम्हाला हा पराभव स्वीकारावा लागला. मागच्या संपूर्ण सामन्यात केलेली कामगिरी या पराभवामुळे नक्कीच विसरली गेली आहे,असेही रोहित शर्मा म्हणाला. आम्ही पुन्हा पुढच्या वर्ल्डकपला चांगल्या पद्धतीने लढू मात्र त्यावेळी मी असेल का नाही ,हे सुद्धा रोहित बोलून गेला.
सहजीच रोहितच्या या वाक्याने चाहत्यांना प्रश्न पडला की, रोहित आता कर्णधार पदाचा राजीनामा देणार कि काय? मात्र पराभवाने नाराज झाला असला तरीही रोहित शर्मा साध्याच राजीनामा देण्याच्या कोणत्याही मूडमध्ये नाहीये. तो टीम इंडियासाठी आणखी सामने खेळणार आहे. रोहितला पराभवाला जिम्मेदार धरून भारतीय चाहते आता त्याला कर्णधार पद सोडण्यास सांगत आहेत मात्र रोहितने कर्णधार म्हणून पराभवाची सर्व जिम्मेदारी स्वतःवर घेतली असली तरीही तो तूर्तास राजीनामा देईल असं वाटत नाही.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..