- Advertisement -

VIRAL VIDEO: “म्हणून शनाका 98 धावांवर बाद होत असतांना सुद्धा त्याला खेळू दिले” मोहमद शमीने केलेल्या मांकडिंगवर रोहित शर्माने केला खुलासा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल ..

0 0

VIRAL VIDEO: “म्हणून शनाका 98 धावांवर बाद होत असतांना सुद्धा त्याला खेळू दिले” मोहमद शमीने केलेल्या मांकडिंगवर रोहित शर्माने केला खुलासा, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल ..


आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खिलाडूवृत्तीची अनेक उदाहरणे आहेत. खेळाडूंनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीची चर्चाही आपणास अनेक वेळा पाहायला मिळतात. प्रत्येक वेळी असे होत नसले तरी ज्या दिवशी ते घडते, त्या दिवशी तो खेळाडू चाहत्यांच्या हृदयात वेगळे स्थान निर्माण करतो.

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मानेही श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवशीय सामन्यात असेच काहीसे केले आहे. रोहित शर्माने आऊट बॅट्समनला नॉन-स्ट्राइकिंग एंडला खेळण्याची परवानगी दिली आणि श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यादरम्यान अंपायरकडून थर्ड अंपायरकडे पाठवण्यात येत असलेले अपील मागे घेतले.

श्रीलंकेच्या डावातील शेवटच्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. रजिता स्ट्राइकवर होता आणि जबरदस्त फलंदाजी करत असलेला शनाका 98 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर नॉन-स्ट्रायकिंग एंडला होता. यावेळी मोहम्मद शमी टीम इंडियाकडून गोलंदाजी करत होता. गोलंदाजी करताना शमी क्रीजजवळ येताच शनाका स्ट्राईक एंडला धावबाद झाला. त्याची बॅट क्रीजबाहेर होती आणि चेंडू टाकण्यापूर्वीच तो  क्रीजच्या बाहेर पडला होता. ज्यानंतर शमीने स्टंप उडवले.

रोहित शर्मा

यानंतर अपील झाल्यावर मुख्य पंचांनी प्रकरण थर्ड अंपायरकडे पाठवण्याचे संकेत दिले. त्याच दरम्यान कर्णधार रोहित शर्मा स्टंपजवळ आला आणि खिलाडूवृत्ती दाखवत त्याने शमीला असे बाद करू नकोस असे सांगितले.  शिवाय रोहितने लगेच पंचाना अपील मागे घेण्याचे संकेत दिले आणि फलंदाज शनाका सुरक्षित क्रीजवर राहिला. नंतर शमी आणि रोहित सुद्धा हसायला लागले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

येथून चौथ्या चेंडूवर शनाकाला स्ट्राईक मिळाला आणि पाचव्या चेंडूवर त्याने चौकार मारून शतक पूर्ण केले. पुढच्या चेंडूवर त्याने षटकार ठोकला आणि श्रीलंकेचा डाव 8 बाद 306 धावांवर संपला. रोहित शर्माने शनाकाला खेळू दिले आणि या गोष्टीने सर्वांचे मन जिंकले. आयसीसीचा स्पष्ट नियम असला तरी जर फलंदाज क्रीझच्या बाहेर असेल तर गोलंदाज त्याला बाद करू शकतो. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा 67 धावांनी पराभव केला.

पहा व्हिडीओ:


आणखी ताज्या स्पोर्ट्स बातम्या:

Viral Video: आडवा पडून सूर्यकुमार यादवने मारला एवढा जबरदस्त षटकार की श्रीलंकेचा कोच सुद्धा झाला हैराण, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल…

8 षटकार 6चौकार.. सुर्यकुमार यादव ने श्रीलंकेच्या गोलंदाजांना फोडून काढत ठोकले ताबडतोब शतक, श्रीलंकेसमोर विजयासाठी तब्बल एवढ्या धावांचे विशाल लक्ष…

दारू आणि सिगारेटचे शौकीन आहेत भारतीय क्रिकेट संघातील हे 5 खेळाडू, 2 नंबरच्या खेळाडूचे नाव वाचून तर सरकेल पायाखालची जमीन…

 

Leave A Reply

Your email address will not be published.