IND vs SL: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत आज दोन नोव्हेंबर रोजी भारताचा सातवा सामना श्रीलंके विरुद्ध होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यामध्ये भारताची नजर विजावर असून आजचा सामना जिंकल्यास भारत सेमी फायनल तिकीट पक्के करू शकतो. आजचा सामना श्रीलंकेसाठी महत्त्वपूर्ण असला तरी त्यांच्या विजयाचे फारसे महत्त्व सेमी फायनलच्या तिकीटवर होणार आहे. केवळ सन्मानाच्या लढाईसाठी हा संघ मैदानात उतरेल.
अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या आजच्या सामन्यात देखील बाहेर राहू शकतो, याची माहिती प्रेस कॉन्फरन्स मध्ये रोहित शर्मा ने दिली आहे. मधल्या फळीतील फलंदाज श्रेयश अय्यर याला पुन्हा एकदा संधी मिळण्याची शक्यता आहे. त्याने केवळ या स्पर्धेत एकच अर्धशतक ठोकले आहे. शॉर्ट बॉलवर त्याची कमजोरी समोर येत आहे. वेगवान गोलंदाजास अनुकूल असलेल्या या खेळपट्टीवर श्रीलंकेचे गोलंदाज त्याला चांगलेच परेशान करू शकतील. श्रेयसला या सामन्यांमध्ये संधी मिळणार का नाही? हा प्रश्न विचारल्यावर खेळपट्टी पाहून अंतिम 11 जणांच्या संघ निवडला जाईल असे प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगितले. आजच्या सामन्यात श्रेयसच्या जागी ईशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
लखनऊ मध्ये इंग्लंड विरुद्ध झालेल्या सामन्यात 229 धावांचे आव्हान भारतीय गोलंदाजांनी इंग्लिश फलंदाजांना पार करू दिले नाही. यंदाच्या स्पर्धेत शमीने दोन सामन्यात 9 बळी घेतले तर सहा सामन्यात बुमराह ने14 विकेट घेतले आहेत. कुलदीप यादव हा देखील कमालीचा फॉर्मत आहे. रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज हे देखील आजच्या सामन्यात खेळताना दिसतील. मागच्या सामान्यत मोहम्मद सिराजला फारसे यश मिळाले नसले तरी आजच्या सामन्यात त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या सामन्यात भारतीय संघाचे पारडे जड मानले जात आहे. श्रीलंकेने या स्पर्धेत फारशी चमक दाखवली नसली तरी भारतीय संघ या संघाला हलक्यात घेण्याचे विचार करणार नाही. 2011 मध्ये भारतात झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामना याच मैदानावर दोन्ही संघाचा आमना सामना झाला होता. भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषकावर दुसऱ्यांना नाव कोरले होते.
भारताचा संभाव्य संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ईशान किशन, केएल राहुल (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.