Sports Featureक्रीडा

आयपीएल 2023 आधी आरसीबीच्या संघातील ह्या 3 चुका दुरुस्त कराव्या लागतील, अन्यथा यावर्षी सुद्धा ट्रॉफी जिंकणे स्वप्नच बनून राहील..

आयपीएल 2023 आधी आरसीबीच्या संघातील ह्या 3 चुका दुरुस्त कराव्या लागतील, अन्यथा यावर्षी सुद्धा ट्रॉफी जिंकणे स्वप्नच बनून राहील..


आयपीएल 2022 मध्ये  प्लेओफ पर्यंत जाऊन सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन बाहेर पडलेला सर्वांचा आवडता संघ आरसिबी हा ट्रॉफी न जिंकलेल्या त्या संघांपैकी एक आहे ज्यांचे चाहते सर्वाधिक जास्त आहेत. आयपीएलमध्ये जर मुंबई आणि चेन्नई सोडले तर त्यानंतर चाहत्यांच्या बाबतीती आरसिबीचा नंबर लागतो. करोडो चाहते असलेला हा संघ मात्र आजपर्यंत आयपीएलची एकही ट्रॉफी जिंकू शकला नाहीये.

आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अश्या 3 समस्याबद्दल सांगणार आहोत, ज्या समस्या जर आरसीबीच्या संघ संचालकांनी सोडवल्या तर संघाची कामगिरी नक्कीच सुधारून ट्रॉफी जिंकण्याची शक्यता वाढू शकते.. चला तर जाणून घेऊया त्याबद्दल अगदी सविस्तर..

१. तिसऱ्या क्रमांकावर कायमचा खेळाडू..

आरसीबी

या यादीतील संघाच्या पहिल्या समस्येबद्दल बोलायचे तर ते तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीकरणारा फलंदाज आहे. कोणत्याही संघासाठी सलामीच्या जोडीबरोबरच तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजीलाही विशेष महत्त्व असते. कारण चांगली सुरुवात न  करता सलामी जोडीतील फलंदाज बाद झाला आणि  तिसऱ्या क्रमांकाची फलंदाज सुद्धा अपयशी ठरला तर संघासमोर समस्या निर्माण होते. असेच काहीसे आरसीबी संघातही पाहायला मिळत आहे. आतापर्यंत विराट संघाकडून तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीचा क्रम सतत बदलत होता. आणि त्यानंतर फाफ डू प्लेसीसने सुद्धा तेच केले. आरसिबीने कधीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी कायम असा एक खेळाडू निवडला नाहीये.

संघ व्यवस्थापनानेही या क्रमांकावर कोणताही खेळाडू निश्चित केलेला नाही. या ठिकाणी कधी  वॉशिंग्टन सुंदर तर कधी  रजत पाटीदार यांना मैदानात उतरवले जात होते. मागच्या 3 हंगामावर लक्ष दिले तर असे लक्षात येते की  या क्रमांकावर आरसीबीने तब्बल 8 खेळाडूंना आजमावून पहिले आहे, अमर त्यांपैकी एकही त्या जागेला योग्य असा न्याय देऊ शकले नाहीये. त्यामागे हे कारण आहे की, एक दोन सामन्यात अपयशी ठरताच संघ त्याची जागा पुन्हा बदलतो. आरसिबीला जर आयपीएल 2023 जिंकायचे असेल तर या समस्येवर उपाय शोधावा लागणार आहे.

२.मॅच फिनिशरच्या समस्येवर संघाला तोडगा काढावा लागणार

2021 च्या हंगामापर्यंत आरसिबीची सर्वांत मोठी समस्या ही फिनिशरची होती. कारण एबी डिव्हीलीयर्स जर अपयशी ठरला तर सामना जिंकून देईल असा एकही फिनिशर संघाला आजून सापडला नव्हता. मात्र 2022 मध्ये संघाला दिनेश कार्तिकच्या रूपाने एक  फिनिशर सापडला आणि त्याने आपल्या खेळाने सर्वांचे हृद्य जिंकले. मात्र आता खरी समस्या पुन्हा तीच समोर आलीय. ग्लेन मेक्सवेल आणि दिनेश कार्तिक हे दोघे जर अपयशी झाले तर पुन्हा संघाची गत सारखीच होते. आणि मागच्या त्यांच्या खेळी पहिल्या तर मेक्सवेल आणि कार्तिक एकाच सामन्यात दोघे कधीही चांगली पार्टनरशिप करतांना दिसून आले नाहीत.

 

View this post on Instagram

 

A post shared by RCB 12th Man Army (@rcbfans.official)

अशा स्थितीत संघ व्यवस्थापनाला असा पर्याय शोधावा लागेल, जो अखेरपर्यंत शानदार फलंदाजीसोबतच संघाची धावसंख्या वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकेल. कारण खालच्या स्तरावर संघ फलंदाजीच्या समस्येशी झुंजताना दिसत आहे. ते मजबूत करणे आवश्यक आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हे करता आले नाही तर चॅम्पियन होण्याआधीच संघाला हार पत्करावी लागू शकते.

३.प्लेऑफपूर्वी डेथ ओव्हरचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे.

याशिवाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तिसरी मोठी समस्या डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी आहे.2022  हंगामात आरसिबीच्या गोलंदाजांची गोलंदाजी तशी सुमार रहिलीय.  स्पेशली जेव्हा विषय डेथ ओव्हरचा येतो तेव्हा आरसीबीच्या गोलंदाजांनी तुफान धावा खर्च केल्या आहेत. यजुवेन्द्र चहलच्या जाण्याने संघाच्या डेथ ओव्हरची जिम्मेदारी हर्षल पटेल आणि वनिंदू हसरंगा यांच्यावर आली आहे आणि हे दोन प्रमुख गोलंदाजचं जास्त धावा देतांना दिसले होते. 2022 हंगामात हसरंगाने चांगली गोलंदाजी केली तो पर्पल केपंच्या शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहिला होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by RCB 12th Man Army (@rcbfans.official)

2021 मध्ये आणि 22 मध्ये हर्षल पटेलला सुद्धा चांगल्याच धावा पडल्या. ज्यामुळे जर आयपीएल 2023 मध्ये विजयी होऊन ट्रॉफी नावावर करायची असेल तर संघ व्यवस्थापकांना डेथ ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज तयार करणे,अत्यंत आवश्यक आहे..

जर संघाने वरील 3 चुकांवर काम केले तर नक्कीच त्यांच्या सांघिक खेळात सुधारणा होतील, आणि आयपीएल 2023 च्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची त्यांची इच्छा कदाचित पूर्ण होऊ शकेल.


हेही वाचा:

VIRAL VIDEO: हेन्री निकोलसला बाद करण्यासाठी कुलदीप यादवने टाकला किलर स्पिन बॉल.. लेफ्ट स्टंपला पीच होऊन उडाला ऑफ स्टंप, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

न्युझीलंडविरुद्ध एकाच सामन्यात विजय मिळवताच हार्दिक पंड्यामध्ये आला अहंकार, “म्हणाला आता मी गोलंदाजी करणार नाही”

पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button