ज्या मित्रासाठी धोनी सर्वांसोबत लढला, त्याच मित्राने 14 वर्षानंतर धोनीच्या त्या निर्णयावर व्यक्त केली शंका, “म्हणाला तिथे धोनीने चूक केली होती”
महेंद्रसिंग धोनी (MS धोनी) हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आणि 2 विश्वचषक जिंकले. 2007 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्याच सत्रात पाकिस्तानला पराभूत करून T20 विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर जोगिंदर शर्माने अंतिम षटक टाकले आणि तो संघाच्या विजयाचा हिरो ठरला. भारताचा चॅम्पियन बनल्यानंतर 16 वर्षांनंतर धोनीचा जिवलग मित्र आरपी सिंगने धोनीने जोगिंदर शर्माला अंतिम ओव्हर देण्याच्या निर्णयाबाबत मोठा खुलासा केला आहे.

SA20 लीग सामन्यात समालोचन करताना जोगिंदर शर्माला अंतिम षटक देण्याच्या धोनीच्या निर्णयामागील खरे कारण आरपी सिंगने उघड केले. आरपी सिंगने सांगितले की, धोनीने शेवटचे षटक टाकण्यासाठी हरभजन सिंग आणि जोगिंदर शर्माला पर्याय म्हणून ठेवले होते. पण हरभजनने पाकिस्तानच्या डावातील 17 वे षटक टाकले होते आणि त्या षटकात मिसबाह-उल-हकने तीन षटकार मारले होते. यानंतरच धोनीने मोठी रिस्क घेत जोगिंदर शर्माला फायनल ओव्हर दिली.
17 व्या षटकात हरभजनला गोलंदाजी देण्याचा निर्णय मोठा निर्णय होता: आरपी सिंग
आरपी सिंग पुढे म्हणाले, “धोनीला विश्वास होता की, 20 वे षटक 17व्या, 18व्या आणि 19व्या षटकांइतके महत्त्वाचे नाही. त्यावेळी मिसबाह चांगला खेळत होता. हरभजन सहसा 17 वे षटक टाकतो आणि अनेकदा आम्हाला विकेट मिळवून देतो. पण त्या दिवशी मिसबाह-उल-हक वेगळ्या पद्धतीने खेळत होता. त्यामुळे 17 व्या षटकासाठी हरभजनला घेण्याचा धोनीचा निर्णय जड गेला.
‘तो डावखुरा फलंदाज असता तर हरभजनने अंतिम षटक केले असते’
तो पुढे म्हणाला की त्यामुळेच हरभजनने फक्त 3 षटके टाकली. त्याला शेवटचे षटक टाकता आले नाही. मला १९ वे षटक टाकायचे होते आणि माझ्या आधी श्रीसंतने १८ वे षटक टाकले. २०व्या षटकासाठी धोनीकडे दोन पर्याय होते. एक हरभजन सिंग, ज्याच्याविरुद्ध मिसबाहने आक्रमक फलंदाजी केली आणि दुसरा जोगिंदर. तेव्हा डावखुरा फलंदाज असता तर कदाचित हरभजनने अंतिम षटक महागात पडूनही टाकले असते. पण स्ट्राईकवर उजव्या हाताचा फलंदाज होता. त्यामुळेच धोनीने जोगिंदरकडे चेंडू दिला आणि त्यानंतर काय झाले. तो इतिहास आहे.
हेही वाचा:
विराट कोहलीच्या खेळीवर कर्णधार रोहित शर्मा भलताच खुश, सामना जिंकल्यानंतर केले हे मोठे विधान..
Ms धोनी चे फार्महाऊस बघितले तर घालाल तोंडात बोटं, फार्म हाऊस ची किंमत ऐकून विश्वास बसणार नाही.