“भाई इस बार तो उठाले..” RR vs RCB सामना सुरु होण्याआधी कर्णधार फाफ डूप्लेसी ट्रॉफीकडे पाहतच राहिला व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

0
3

RR vs RCB: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (RR vs RCB) यांच्यातील एलिमिनेटर सामना अहमदाबाद येथील स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी करो ‘और मरो’ असा असेल. कोणताही संघ सामना हरेल, तो आयपीएलमधून बाहेर जाईल. तर विजयी संघ क्वालिफायर-2 मध्ये जाईल, जिथे त्याचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. त्यानंतर क्वालिफायर-2 जिंकल्यानंतर त्यांचा अंतिम फेरीचा मार्ग मोकळा होईल.

"भाई इस बार तो उठाले.." RR vs RCB सामना सुरु होण्याआधी कर्णधार फाफ डूप्लेसी ट्रॉफीकडे पाहतच राहिला व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल..

RR vs RCB: फाफ डू प्लेसिस बराच वेळ ट्रॉफीकडे पाहत राहिला

आरसीबी यावेळी ट्रॉफी मिळविण्यासाठी उत्सुक आहे कारण आतापर्यंत एकदाही आयपीएल जिंकले नाही. ही अस्वस्थता आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिसच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीतूनही दिसत होती. फॅफ डु प्लेसिसचा एक फोटो चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. ज्यामध्ये तो ट्रॉफीवर नजर ठेवताना दिसत आहे.

RR vs RCB:फाफ डू प्लेसिस ट्रॉफीवरील संघांची नावे पाहत होता.

आयपीएल ट्रॉफीवर विजेत्या संघांची नावे लिहिलेली असतात. फाफ त्यात लिहिलेली सगळी नावे वाचत होता. जरी त्याने आरसीबीचे नाव पाहिले नसेल. फॅफ बराच वेळ या ट्रॉफीकडे पाहत राहिला. कदाचित या वेळी आरसीबीचे नाव ट्रॉफीवर नक्कीच नोंदवेल असा त्यांचा विचार असेल.

आयपीएल ट्रॉफीवर संघांच्या नावांव्यतिरिक्त एक संस्कृत श्लोक देखील लिहिला आहे. ट्रॉफीवर भारताचा नकाशा असून त्याच्या जवळ ‘यात्रा प्रतिभा अवसर प्राप्नोती’ असे लिहिले आहे. म्हणजे जिथे टॅलेंटला संधी मिळते. आयपीएल ट्रॉफी सोन्याची आहे. त्याची किंमत सुमारे 5 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

यावेळी फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीने चमत्कारिक कामगिरी करत एलिमिनेटरमध्ये स्थान मिळवले आहे. आरसीबीने सलग 5 सामने जिंकून ही कामगिरी केली. आता आरसीबी अंतिम फेरीत पोहोचण्याच्या जवळ आहे. आतापर्यंतच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर आरसीबीने आतापर्यंत तीनदा फायनलमध्ये प्रवेश केला आहे, पण एकदाही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. आरसीबीने 2009, 2011 आणि 2016 मध्ये अंतिम फेरी गाठली होती. मात्र, तीनही वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.


==

आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.

महेंद्रसिंग धोनीच्या आई वडिलांसोबत कसे आहेत साक्षीचे संबंध? धोनीच्या नातेवाईकांबद्दल पत्नी साक्षी धोनी ने केला मोठा खुलासा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here