एक दिवसीय क्रिकेट सामन्यात शतक मारणे खूपच कठीण आणि अवघड असते हे तुम्हाला माहीतच आहे. बऱ्याच वेळा अनेक असे खेळाडू आहेत ज्यांचे शतक थोडक्यासाठी हुकले आहे. बऱ्याच वेळा पाहिलं असेल अनेक खेळाडू 99 वर आऊट होतात. खर तर एकदिवस क्रिकेट सामन्यात खेळाडू ला सर्वात मोठे दुःख हे 99 धावांवर बाद झाल्यावर होते. आज या लेखात आम्ही आपणास अश्या खेळाडू बद्दल सांगणार आहेत जे एकदिवसीय सामन्यात 99 धावांवर बाद झाले आहेत. या मध्ये अनेक भारतीय खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे.

ज्योफ्री बॉयकॉट:-
ज्योफ्री बॉयकॉट हा इंग्लंड चा उत्कृष्ट फलंदाज आहे. सण 1974 साली पहिल्यांदा एकदिवसीय सामन्यात तो 99 धावांवर बाद झाला. त्यानंतर पुढील सामन्यात ते 99 धावांवर नाबाद खेळला आणि सामना जिंकला आणि नंतर च्या सुद्धा एका सामन्यात ज्योफ्री बॉयकॉट 99 वर बाद झाला. आतापर्यंत एकदिवसीय सामन्यात तो 3 वेळा 99 वर बाद झाला आहे.
सचिन तेंदुलकर :-
भारतातील सर्वात चाहता मास्टर ब्लास्टर म्हणजेच सचिन तेंडुलकर. भारताचा सर्वात जबरदस्त फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर ला ओळखले जाते. क्रिकेट करियर मध्ये सचिन 99 वर 3 वेळा बाद झाला आहे. याच बरोबर 17 वेळा 90 ते 99 च्या दरम्यान सचिन बाद झाला आहे.
मिस्बाह उल हक:-
एकदिवसीय सामन्यात मिस्बाह उल हक याचा क्रमांक 3 रा येतो. आतापर्यंत मिस्बाह उल हक एकदिवसीय सामन्यात 3 वेळा 99 धावांवर बाद झाला आहे शिवाय एकवेळी 99 धावांवर नाबाद होऊन पेवेलियन मध्ये परतला आहे.
यां खेळाडू व्यतिरक्त वीरेंद्र सेहवाग, एलेक्स हेल्स, सनथ जयसूर्या आणि डीन हे खेळाडू सुद्धा एक दिवसीय सामन्यात 2 वेळा 99 वर बाद झाले आहेत.