9 षटकार, 4 चौकार.. गुजरातमध्ये पुण्याचा ऋतुराज गायकवाडने उठवले वादळ..!आयपीएलच्या पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकत काढल्या एवढ्या धावा.
9 षटकार, 4 चौकार.. गुजरातमध्ये पुण्याचा ऋतुराज गायकवाड चमकला.!.आयपीएलच्या पहिल्या सामन्यात शानदार अर्धशतक ठोकत काढल्या एवढ्या धावा.
आयपीएल 2023चा पहिला सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने पहिल्याच सामन्यात शानदार फलंदाजी करत ९२ धावांची दमदार खेळी करत आयपीएल 2023 मधील पहिले अर्धशतक ठोकलंय. गायकवाड शतक करण्यापासून जरी चुकला असला तरी पहिल्याच सामन्यात त्याने पुन्हा एकदा इतर संघाना आपल्या फोर्ममुळे चिंतेत टाकले आहे.
For his stunning 9⃣2⃣-run knock, @Ruutu1331 becomes the top performer from the first innings of the opening clash of #TATAIPL 2023 👌 👌 #GTvCSK | @ChennaiIPL
A summary of his innings 🔽 pic.twitter.com/wEJpDT3VXU
— IndianPremierLeague (@IPL) March 31, 2023
ऋतुराजने या खेळीत 50 चेंडूचा सामना करत शानदार 92 धावांची खेळी केली. आपल्या या खेळीत ऋतुराजने उत्तुंग असे 9 षटकार ठोकले सोबतच 4 क्लासी चौकार मारत प्रेक्षकांची मने जिंकली.. सलामीला आलेल्या गायकवाडने तब्बल 16 षटके फलंदाजी केली आणि 16व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर अल्सरी जोसेफने ऋतुराजला बाद केले. शुभमन गिलने त्याचा झेल घेतला आणि ऋतुराजची शानदार पारी समाप्त झाली.
मोहम्मद शमीने पूर्ण केले आयपीएलमध्ये 100 विकेट
पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्सच्या मोहम्मद शमीने एक नवा विक्रम आपल्या नावावर केला आहे. चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर डेवोन केनवेला बोल्ड करताच शमीच्या नावावर आयपीएलमध्ये 100 विकेट झाले आहेत.आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात 100 च्या वर विकेट घेणारा शमी ८ वा गोलंदाज ठरला आहे. त्याच्यासमोर भुवनेश्वर कुमार (१५४विकेट) ,जसप्रीत बुमराह –(१४५विकेट),उमेश यादव – (१३५),संदीप शर्मा – (११४),आशिष नेहरा – (106),विनय कुमार – (१०५),झहीर खान – (१०२) हे गोलंदाज आहेत..

चेन्नईने गुजरात समोर ठेवले 179 धावांचे लक्ष..
प्प्रथम फलंदाजी करतांना चेन्नईने 178 धावा केल्या असून गुजरात समोर 179 धावांचे लक्ष ठेवले आहे. आयपीएल 2023चा पहिला सामना जिंकण्यासाठी गुजरातला 179 धावा कराव्या लागणार आहेत. csk कडून ऋतुराज गायकवाडने शानदार 92 धावा काढल्या. तसेच चेन्नईच्या स्कोरमध्ये मोईन आली (२३) , शिवम दुबे (19) आणि महेंद्रसिंग धोनी (14*) धावांचे योगदान दिले.
हेही वाचा:
IPL 2023 मध्ये CSK या 4 खेळाडूंच्या मदतीने मोठा खेळू शकते, जाणून घ्या कोण आहेत ते खेळाडू.