भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी असला तरी सर्वात जास्त लोकप्रिय खेळ हा क्रिकेट आहे. देशातील लहान मुलापासून ते वयोवृद्ध लोकांपर्यंत अनेक लोकांनां क्रिकेट चे वेड आहे. जर का पैसा आणि प्रसिद्धी मिळवायची असेल तर क्रिकेट आणि बॉलिवूड हे दोनच पर्याय आपल्या समोर येतात.

क्रिकेटर आणि बॉलिवूड मधील सिनेस्टार यांची जीवनशैली ही मध्यम वर्गीय लोकांपेक्षा खूप लक्झरी असते. तसेच क्रिकेटर आणि सिनेस्टार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणावरून चर्चेत असतात.
गेल्या महिन्यात भारतीय संघाचा आक्रमक फलंदाज ऋषभ पंत चा दिल्ली येथे भीषण अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये ऋषभ पंत ला गंभीर दुखापत झाली होती अनेक शस्त्र क्रिया सुद्धा केल्या होत्या.
अपघातानंतर ऋषभ पंत चां उपचार हा उत्तराखंड मधील डेहराडून येथे करण्यात आला होता. परंतु नंतर ऋषभ पंत ला उपचारासाठी मुंबई येथे हलविण्यात आले. अपघातानंतर ऋषभ पंत ची रिकवरी अत्यंत फास्ट आहे. तसेच सोशल मीडिया वर ऋषभ पंत ने एक फोटो शेयर केला आहे.
अपघातापासून ऋषभ पंत हा कमीत कमी 7 महिने क्रिकेट पासून दूर आहे. तसेच फोटो शेयर करत ऋषभ पंत ने फोटोला एक कॅपशन दिले आहे. त्यामुळे अनेक फॅन्स ची मने जिंकली आहेत.
ऋषभ पंत ने शेयर केलेल्या फोटो ला One step forward,One step stronger,One step better हे कॅपशन दिले आहे. तसेच सोशल मीडियावर हा फोटो मोठ्या प्रमाणात वायरल सुद्धा होत आहे.