Cricket Newsवर्ल्डकप 2023

शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद.. ! ताबडतोब 50 वे शतक ठोकत विराट कोहली ठरला पुन्हा किंग, एकाच सामन्यात सचिनचे हे 3 मोठे विक्रम केले ध्वस्त..

विराट कोहली: विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला: भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात शक्तिशाली फलंदाज आणि आधुनिक मास्टर विराट कोहलीने 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत तिसरे शतक झळकावले. या शतकानंतर त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये इतिहासाच्या पानांवर आपले नाव अजरामर केले आहे.

IND vs NZ: विराट कोहलीने मोडला सचिन तेंडूलकरचा विक्रम, ठरला विश्वचषकात सर्वाधिक धावा ठोकणारा खेळाडू..

1.विराट कोहली ठरला एकदिवशीय क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणारा खेळाडू..

विराट कोहली आता वनडेमध्ये सर्वाधिक शतके करणारा फलंदाज बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 49 वे शतक झळकावून त्याने महान सचिन तेंडुलकरची बरोबरी केली होती पण यावेळी त्याने शतक झळकावून सचिनला मागे सोडले आहे. एवढेच नाही तर या शतकी खेळीत विराटने सचिनचे तीन मोठे विक्रम मोडीत काढले. विराटने ११३ चेंडूंत ९ चौकार आणि दोन षटकारांसह उत्कृष्ट ११७ धावा केल्या.

 

2. IND vs NZ: विराट कोहली ठरला विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

विराट कोहलीने आता सचिन तेंडुलकरचा 2003 विश्वचषकात केलेल्या 673 धावांचा विक्रम मोडला आहे. विश्वचषकात कोणत्याही फलंदाजाच्या या सर्वाधिक धावा होत्या.  विराट कोहलीने मास्टर ब्लास्टरचा हा विक्रमही मोडला आहे. या रेकॉर्डची संपूर्ण यादी पाहूया

विश्वचषकाच्या एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू.

 

  • विराट कोहली-701धावा (2023)

  • सचिन तेंडुलकर- 673 धावा (2003)

  • मॅथ्यू हेडन- 659 (2007)

  • रोहित शर्मा- 648 (2019)

  • डेव्हिड वॉर्नर- 647 (2019)

 

3.. विश्वचषकातील सर्वोच्च ५० प्लस स्कोअर

सचिन तेंडुलकरने २००३ च्या विश्वचषकात सर्वाधिक ७ पन्नास प्लस धावा केल्या होत्या. आता विराट कोहलीने 2023 विश्वचषकात आठव्यांदा फिफ्टी प्लस केले आहेत. विराट कोहलीने या विश्वचषकातील १० सामन्यांमध्ये पाच अर्धशतके आणि तीन शतके झळकावली आहेत. या रेकॉर्डची संपूर्ण यादी देखील पाहूया:

विराट कोहली

८ – विराट कोहली (२०२३)

७ – सचिन तेंडुलकर (२००३)

७ – शकिब अल हसन (२०१९)

६ – रोहित शर्मा (२०१९)

६ – डेव्हिड वॉर्नर (२०१९)


  • हेही वाचा:

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button