ऋतुराज गायकवाडने केला महाविक्रम…आजपर्यंतचा एकही क्रिकेटर करू शकला नाहीये अशी कामगिरी!
ऋतुराज गायकवाडने सोमवारी कर्णधारपदाला साजेशी खेळी खेळली. आणि क्रिकेटच्या इतिहासातील एक जबरदस्त असा आजपर्यंत कोणीही न करू शकलेला विक्रम आपल्या नावावर केला. विजय हजारे ट्रॉफीच्या उपांत्यपूर्व फेरीत त्याने यूपीविरुद्ध 159 चेंडूत नाबाद 220 धावांची खेळी केली.
आपल्या या खेळीत त्याने10 चौकार आणि 16 षटकार मारले.त्याच्या या महत्वाच्या खेळीत ऋतूराजने क्रिकेटच्या इतिहासतील आजपर्यंतचा सर्वांत मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. एकाच षटकात एक नो बॉल च्या सहाय्याने ऋतूराजने तब्बल 7षटकार ठोकले आहेत.
View this post on Instagram
त्याने एकाच षटकात 7 षटकारांसह 43 धावा केल्या. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 5 गडी गमावून 330 धावा केल्या. या स्पर्धेतील शेवटच्या 8 डावांमधील ऋतुराजचे हे सहावे शतक आहे. यावरून त्याच्या सर्वोत्तम फॉर्मचा अंदाज लावता येतो. आयपीएलमध्ये तो चेन्नई सुपर किंग्जचा महत्त्वाचा भाग होता. 25 वर्षीय ऋतुराजचे लिस्ट-ए कारकिर्दीतील हे 13वे शतक आहे.
डावखुरा फिरकी गोलंदाज शिवा सिंग डावातील 49 वे षटक टाकत होता. त्याच्या पहिल्या चार चेंडूवर सलामीवीर ऋतूराजने सलग ४ षटकार ठोकले.नंतर त्याने ५वा चेंडू नो बॉल टाकला. यावरही ऋतुराजने षटकार ठोकला.आणि नंतर शेवटचा चेंडू सुद्धा षटकार ठोकला. अशाप्रकारे, त्याने एका षटकात 7 षटकार आणि एकचेंडूसह एकूण 43 धावा केल्या.
View this post on Instagram
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार मारणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. सामन्याच्या सुरुवातीला यूपीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राची सुरुवात चांगली झाली नाही.
संघाने 41 धावांत 2 विकेट गमावल्या होत्या. राहुल त्रिपाठी 9 आणि सत्यजीत 11 धावा करून बाद झाला. मात्र कर्णधार आणि सलामीवीर ऋतुराज गायकवाड बाजूला उभे राहिले. त्याने अंकित बावणेसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. अंकित 54 चेंडूत 37 धावा करून बाद झाला.
109 चेंडूत शतक पूर्ण!

ऋतुराज गायकवाडने 109 चेंडूत शतक पूर्ण केले. आणि 138 चेंडूत 150 धावांचा टप्पा गाठला. म्हणजेच त्याच्या पुढच्या 50 धावा फक्त 29 चेंडूत आल्या. 159 चेंडूत 220 धावा केल्यानंतर तो नाबाद राहिला. त्याने अजी काझीसोबत चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. अझीम 42 चेंडूत 37 धावा करून बाद झाला. 2 चौकार आणि 2 षटकार मारले. कार्तिक त्यागी हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावांत 3 बळी घेतले.
ऋतुराजने भारतासाठी एक वनडे आणि 9 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या सामन्यापूर्वी त्याने लिस्ट-ए च्या 69 सामन्यांमध्ये 55 च्या सरासरीने 3538 धावा केल्या होत्या. त्याने 12 शतके आणि 16 अर्धशतके केली होती. नाबाद 187 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. त्याने टी-20मध्ये एकूण 3 शतके झळकावली आहेत.
हेही वाचा:
पाकिस्तानच्या विजयानंतर भारतीय संघात होणार 3 मोठे बदल, असा असेल इंग्लंडविरुद्ध भारतीय संघ…
या कारणांमुळे पंजाब किंग्सने मयंक अगरवालचा पत्ता केला कट, आता हा खेळाडू झाला पंजाब किंगचा कर्णधार..