ताज्या बातम्या आणि अपडेट्स Whattsapp वर मिळवण्यासाठी जॉईन करा: Whatsapp Group
=======
चेन्नई सुपर किंग्स: आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामाला आज 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूर या संघामध्ये चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर आमना सामना होणार आहे. दोन्ही संघांमध्ये काही बदल आपल्याला पाहायला मिळतील. चेन्नईचा संघ ऋतुराज गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल तर आरसीबीचा संघ फाफ डु प्लेसिस याच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
महेंद्रसिंग धोनीने ऋतुराज गायकवाड कडे सोपावले चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद.
महेंद्रसिंग धोनी 2019 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. निवृत्तीनंतर तो आता आयपीएल मध्ये खेळतोय. यंदाचे त्याचे शेवटचे आयपीएल वर्ष असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी त्याने चेन्नई सुपर किंग्स संघाच्या नेतृत्वपदाचा राजीनामा दिला आहे. त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएल चषक जिंकला आहे. मागील वर्षी त्याच्याच नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने गुजरात टायटन्सचा पराभव करत किताब जिंकला होता.
ऋतूराज गायकवाड बने चेन्नई के नये कप्तान..#IPL2024 #IPLonJioCinema #RuturajGaikwad #CSKvsRCB #MSDHONI #MSDhoni #ChennaiSuperKings #RohitSharma pic.twitter.com/XRcuQ166zq
— IPL LATEST NEWS (@newsipl23) March 21, 2024
42 वर्षीय धोनीने 222 सामन्यात चेन्नई संघाचे नेतृत्व केले होते. त्यापैकी 128 सामन्यात विजय मिळवता आला. तर 82 सामन्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. तर दोन सामन्याचा निकाल लागू शकला नाही. चेन्नई यंदाच्या आयपीएल वर्षात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.
असे आहे ऋतुराज गायकवाडचे आयपीएल करिअर!
चेन्नईने कर्णधार पदाची जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर दिली आहे. ऋतुराज हे 2019 मध्ये सीएसके संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. या खेळाडूंनी आयपीएलच्या 52 सामन्यांमध्ये 135.52 च्या सरासरीने 1,797 धावा केल्या आहेत. त्याच्या नावे आयपीएलमध्ये एक शतक आणि 14 अर्धशतकांची नोंद आहे.
मागील वर्षी या खेळाडूंने सीएसके कडून खेळत असताना 590 धावा केल्या होत्या. चेन्नईला आयपीएल 2023 चा किताब मिळवून देण्यात या खेळाडूची महत्त्वाची भूमिका राहिली. तो सीएसके कडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला.
ऋतुराज गायकवाडचे अंतरराष्ट्रीय करिअर!
27 वर्षाच्या या खेळाडूंने भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2017 मध्ये पदार्पण केले होते. t20 मध्ये आतापर्यंत त्याने 19 सामने खेळला असून त्यात त्याने 510 धावा केले आहेत. त्यात एका शतकाची तर तीन अर्धशतकाची नोंद आहे. याचबरोबर त्याने मागील वर्षी आशियाई खेळामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यात त्याला यश मिळत भारताने सुवर्णपदक पटकावले. तसेच भारताकडून वनडे सामने खेळताना 6 सामन्यात 115 धावा केल्या होत्या.
====
आमचे ईतर लेख आणि ट्रेंडीग बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.