SA vs NZ RECORDS: 190 धावांनी न्यूझीलंडचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेने केला अनोखा कारनामा, 1999 नंतर पहिल्यांदाच केलीय अशी कामगिरी..

केशव महाराज

 

SA vs NZ RECORDS: विश्वचषक 2023 मध्ये काल (१ नोव्हेंबर) दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड (SA vs NZ) यांच्यात सामना झाला. दक्षिण आफ्रिका संघाने  संघाने 357 धावांचा बचाव करत न्यूझीलंडचा 190 धावांनी पराभव केला. मार्को जॅनसेन आणि केशव महाराज यांनी 7 विकेट्स घेतल्या, ज्याच्या मदतीने न्यूझीलंडचा संघ 167 धावांवर गुंडाळला गेला.

SA vs NZ RECORDS:  क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी ठोकली शानदार शतके.

SA vs NZ RECORDS

याआधी, क्विंटन डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी शतके झळकावून दक्षिण आफ्रिकेला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेले. त्यांच्या शानदार शात्कीय खेळीच्या जोरावर टीम दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करतांना निर्धारित 50 षटकात 4 गडी गमावून 357 धावा केल्या. प्रतुत्तरात खेळतांना न्यूझीलंडला 190 धावांनी पराभव स्वीकारावा लागला..

SA vs NZ RECORDS: 1999 नंतर विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच दक्षिण आफ्रिकेने केला न्यूझीलंडचा पराभव.

या सामन्यात  संघाने दक्षिण आफ्रिकेने 1999 नंतर प्रथमच विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडचा पराभव केला. याआधी कधीही न्यूझीलंड दक्षिण आफ्रिकेकडून विश्वचषक स्पर्धेमध्ये पराभूत झाला नव्हता. काल दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडवर 190 धावांनी मोठा विजय मिळवत आपली पराभवाची मालिका खंडित केली आहे..

केशव महाराज

SA vs NZ सामन्याचे हाल

प्रथम खेळताना दक्षिण आफ्रिकेने 357/4 धावा केल्या होत्या, त्यानंतर किवी संघाचे खेळाडू स्वस्तात बाद झाले. दक्षिण आफ्रिकेने 21 व्या शतकात न्यूझीलंडवर पहिला विश्वचषक जिंकला आहे. या सामन्यापूर्वी ब्लॅक कॅप्सने गेल्या पाच विश्वचषक सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. या संदर्भात दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा विजय 1999 च्या विश्वचषकात मिळाला होता, ज्यात त्यांनी बर्मिंगहॅममध्ये 74 धावांनी विजय मिळवला होता.


हेही वाचा:

ODI वर्ल्डकप 2023 नंतर टीम इंडियातील ‘हे’ 3 स्टार खेळाडू होऊ शकतात निवृत्त, स्वतः दिग्गज खेळाडूने दिले संकेत..

“मला आता सवय झाली आहे..” वर्ल्डकप 2023 साठी भारतीय संघात जागा न मिळाल्यामुळे युजवेंद्र चहल नाराज, पहिल्यांदाच बोलत केला मोठा खुलासा..

टेलेंट असूनही या 4 खेळाडूंना कधीही संघात जागा मिळाली नाही, एकाने तर केले होते जबरदस्त प्रदर्शन तरीही केवळ 2 वर्षचं टिकली क्रिकेट कारकीर्द..