SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव; महमुदुल्लाहची एकाकी झुंज व्यर्थ..

SA vs BAN:  आयसीसी विश्वचषक 2023 मध्ये बांगलादेशचा सलग तिसऱ्या सामन्यात पराभव झाला. साऊथ आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात बांगलादेशचा संघ हा पत्त्याप्रमाणे कोसळून गेला आणि संपूर्ण संघ 233 धावांवर बाद झाला. साऊथ आफ्रिकेने हा सामना 149 धावांनी जिंकला.

बांगलादेशचा एकदिवसीय क्रिकेट मधील विश्वचषक स्पर्धेतला साउथ आफ्रिकेच्या विरुद्ध सर्वात मोठ्या भावाने झालेला हा तिसरा पराभव आहे. 383 धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या बांगलादेशचा संघ सबसे ठरला. यात केवळ महमदुल्लाह याने शानदार बॅटिंग केली.

World Cup Records: विश्वचषक स्पर्धेत 3 वेळा झालाय पाकिस्तानचा संघ अपसेट; वाचा कोणत्या संघानी केलाय पाकिस्तानचा पराभव

383 धावांचे आव्हान मैदानात घेऊन उतरलेल्या बांगलादेशच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली मार्को याने दोन चेंडूच्या आज दोन खेळाडूंना बाद केले त्यामध्ये तनजीम हसन आणि शांतो यांचा समावेश होता. कर्णधार शाकिब हसन या सामन्यात छाप सोडण्यात अपयशी ठरला तो एक धावांवर माघारी परतला. दुखापतीमुळे तो स्पर्धेतील तीन सामन्यांना मुकला होता. त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी ही शांतोवर देण्यात आली होती. अनुभवी फलंदाज मुशफिकपूर रहीम याने केवळ आठ धावा काढल्या.

महमुदुल्लाह शतकीय खेळी करत बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. आठव्या विकेटसाठी त्याने पहिल्यांदा हसन महमूद याच्यासोबत 37 धावांची भागीदारी केली त्यानंतर नव्या विकेटसाठी मुस्तफा फेब्रुवारी याच्यासोबत अर्धशतकीय भागीदारी रचली. महमूदुल्लाह शतकी खेळत करत 111 धावांवर बाद झाला. त्यानंतर बांगलादेशचा संघ 233 धावांवर सर्व बाद झाला. महमूदुल्लाहने याने या सामन्यात दमदार 111 धावांची खेळी केली. त्याने दक्षिण आफ्रिकेच्या सर्वच गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला. तसेच त्याने या खेळीमध्ये 11 चौकार आणि 6 उत्तुंग षटकार ठोकले.

SA vs BAN: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात बांगलादेशचा दारुण पराभव; महमुदुल्लाहची एकाकी झुंज व्यर्थ..

बांगलादेशचा पाच सामन्यातला हा सलग चौथा पराभव आहे. या पराभवामुळे बांगलादेशचे सेमी फायनल मध्ये पोहोचण्याचे सर्वच रस्ते अवघड झाले आहेत. साऊथ आफ्रिका विरुद्धच्या या सामन्यांमध्ये बांगलादेशचा कोणताच खेळाडू हा खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. बांगलादेशच्या मधल्या फळीतील फलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेपुढे अक्षरशः लोटांगण घातले. मात्र तळाकडच्या फलंदाजांनी थोडीफार झुंज दिल्याने संघाचे धावसंख्या 200 च्या पुढे गेली. अन्यथा हा संघ दीडशे धावांवर बाद झाला असता.

दक्षिण आफ्रिकेचा यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील पाच सामन्यापैकी चौथा विजय ठरला. या विजयासह साउथ आफ्रिकेचे एकूण आठ गुण झाले आहेत. गुणतलिकेत हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. नेट रन रेटच्या आधारावर हा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. तर तितकेच गुण मिळवून न्यूझीलंडचा संघ तिसऱ्या स्थानावर गेला आहे.


हेही वाचा:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *