SA vs NED: विश्वचषक स्पर्धेत पुन्हा दुसरा उलट फेर; नेदरलॅंड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला पाजले पाणी..
SA vs NED: आयसीसी विश्वचषक 2023(World cup 2023) च्या स्पर्धेत काल आणखीन एक उलट फेर पाहायला मिळाला. मंगळवारी धर्मशाळाच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नेदरलँडच्या संघाने धमाकेदार प्रदर्शन करत दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघाला 38 धावांनी पराभूत करत साऱ्यांना चकित करून सोडले. नेदरलँड्सने दिलेले 246 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेचा संघ पार करू शकला नाही. 207 धावांवर सर्व संघ बाद झाला.
भारतात सुरू असलेल्या विश्वचषक स्पर्धेतला हा दुसरा सर्वात मोठा उलटफेअर आहे. यापूर्वी अफगाणिस्ताने वर्ल्ड चॅम्पियन इंग्लंडला हरवत मोठा चमत्कार घडवून आणला होता. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेला 43 षटकात 246 धावांचे आव्हान मिळाले होते. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात ही खराब झाली क्विंटन डिकॉक हा 20 धावावर एकरमनच्या चेंडूवर बाद झाला तर टेंबा बाउमा हा 16 धावांवर वेंडी मरवेच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीच झाला. यानंतर रेसी वेन डर डुसेन अवघ्या चार धावांवर माघारी परतला. तर ऍडम मार्क्रम फक्त एकच धाव करू शकला.
One of the greatest ICC Men’s Cricket World Cup upsets of all time in Dharamsala as Netherlands overcome South Africa 🎇#SAvNED 📝: https://t.co/gLgies5ZBv pic.twitter.com/KcbZ10qdAG
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) October 17, 2023
कालसेन हा डेव्हिड मिलरच्या साथीने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. व्हेन बिकने क्लासेंनला 28 धावांवर माघारी धाडले. डेविड मिलर जोपर्यंत मैदानावर होता, तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेच्या विजयाच्या आशा कायम होत्या. 31व्या शतकामध्ये वॅन बिक याने डेव्हिड मिलरला क्लीन बोल्ड करत नेदरलँडच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. नेदरलँड कडून गोलंदाजी मध्ये वॅन बिकने सर्वाधिक तीन गडी बाद केले. नेदरलँडच्या नवख्या गोलंदाजापुढे दक्षिण आफ्रिकासारख्या बलाढ्य संघातील कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरून खेळू शकला नाही.
सामन्याच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम नेदरलँडच्या संघाला फलंदाजी करण्यास पाचारण केले. मात्र नेदरलँडच्या संघाची सुरुवात ही निराशा जनक झाली. अवघ्या 82 धावांवर पाच गडी माघारी परतले होते. त्यानंतर स्कॉट एडवर्डस याने कर्णधाराला साजेशी अशी खेळी करत 69 चेंडूत 78 धावांची शानदार खेळी केली. व्हेन डी मर्वे याने 19 चेंडूत 29 धावांचे योगदान दिले, त्यामुळे नेदरलँडच्या संघाने 43 षटकात आठ बाद 245 धावा करता आल्या.
नेदरलँडच्या संघाने यापूर्वी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव केला होता. दक्षिण आफ्रिकेवर हा त्यांचा दुसरा विजय ठरला आहे. या विजयामुळे नेदरलँडच्या खात्यात दोन गुणांची नोंद झाली आहे. दक्षिण आफ्रिकेचे चार सामन्यात तीन विजयासह सहा गुणांची नोंद झाली आहे. गुणतालिकेत हा संघ न्यूझीलंड नंतर तिसऱ्या स्थानावर आहे. नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला असता तर ते गुणतालिकेत टॉप वर राहिले असते.
- हेही वाचा:
- विश्वचषकात पहिल्याच चेंडूवर बाद झाले आहेत हे 6 फलंदाज; एक आहे भारताचा माजी प्रशिक्षक..ऑस्ट्रेलिया-इंग्लंड नव्हे तर भारतच आहे वनडेमध्ये,’चेस मास्टर’; तब्बल 18 वेळा पार केलाय 300 पेक्षा जास्त धावांचा स्कोर.अफगाणिस्तानी तरुणी विद्यार्थ्यांना वाटते विश्वचषकाचे मोफत तिकिटे? कोण आहे ही तरुणी
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी शुभमन गिल विषयी मिळाली मोठी अपडेट; वाचा काय आहे बातमी