SA VS NZ LIVE: ताबडतोब शतक ठोकत क्विंटन डी कॉकने मोडला कुमार संगकाराचा मोठा विक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला दक्षिण आफ्रिकन खेळाडू..
SA VS NZ LIVE: विश्वचषक 2023 (World Cup 2023) मध्ये आज न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका (SA vs NZ) यांच्यात खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करतांना अनुभवी यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने (Quinten De cock) आयसीसी विश्वचषकातील चौथे शतक झळकावले आहे. दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर सध्याच्या स्पर्धेत उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. त्याची चारही एकदिवसीय विश्वचषक शतके भारतात चालू असलेल्या आवृत्तीत आली आहेत. डी कॉकने पुण्यातील एमसीए स्टेडियमवर 32 क्रमांकाच्या सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध चौथे शतक झळकावले.
डी कॉक आणि टेंबा बावुमा यांनी पहिल्या विकेटसाठी 38 धावांची भागीदारी केली. यानंतर, डी कॉक आणि रॅसी व्हॅन डर डुसेन यांनी २०० धावांची भागीदारी केली, जी दक्षिण आफ्रिकेसाठी वनडे इतिहासातील न्यूझीलंडविरुद्ध कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च आहे. डी कॉकने षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. तो 114 धावांवर टीम साऊथीने बाद झाला.
SA VS NZ LIVE: क्विंटन डी कॉकने ने मोडला कुमार संगकाराचा विक्रम..
क्विंटनने श्रीलंकेचा माजी यष्टिरक्षक कुमार संगकाराच्या विश्वचषक स्पर्धेतील शतकांच्या विक्रमाची (4) बरोबरी केली आहे. संगकाराने 2015 च्या आवृत्तीत चार शतके झळकावली होती. भारताचा रोहित शर्मा 2019 मध्ये 5 शतकांसह आघाडीवर आहे.
इतकेच नाही तर विश्वचषक स्पर्धेत ५०० हून अधिक धावा (५४५) करणारा डी कॉक पहिला खेळाडू ठरला आहे. सध्याच्या स्पर्धेत (54) 50 पेक्षा जास्त चौकार मारणारा तो पहिला फलंदाज आहे.
हेही वाचा: