SA20 2024 Winner Prize Money: दक्षिण आफ्रिका T20 लीगचा अंतिम सामना आज न्यूलँड्स क्रिकेट मैदानावर सनरायझर्स इस्टर्न केप आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यात खेळला गेला. सनरायझर्स इस्टर्न केप संघाने हा सामना 89 धावांनी जिंकून सलग दुसऱ्या सत्रात विजेतेपद पटकावले.
SA20 2024 विजेत्याची बक्षीस रक्कम (SA20 2024 Winner Prize Money)
दक्षिण आफ्रिका T20 लीगमधील एकूण बक्षीस रक्कम 70 दशलक्ष रँड आहे (रँड हे दक्षिण आफ्रिकेचे चलन आहे), जे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 31 कोटी रुपये आहे. या हंगामात सनरायझर्स संघाने विजेतेपद पटकावल्यामुळे त्यांना 70 दशलक्ष रँड मिळाले आहेत.
SA20 विजेता 2024 बक्षीस रक्कम: दक्षिण आफ्रिका T-20 लीगच्या विजेत्या संघाला बक्षीस रक्कम म्हणून 34 दशलक्ष रँड मिळतील, जे भारतीय चलनात सुमारे 15 कोटी रुपये आहे.
SA20 2024 उपविजेता: दक्षिण आफ्रिका T-20 लीगच्या अंतिम फेरीत पराभूत झालेल्या संघाला, म्हणजेच उपविजेत्या संघाला 16.25 दशलक्ष रँड मिळतील, जे भारतीय चलनात अंदाजे 7.2 कोटी रुपये आहे.
इतर संघांना मिळालेली बक्षीस रक्कम: भारतीय चलनात, तिसऱ्या स्थानावर असलेल्या संघाला 3.9 कोटी रुपये आणि चौथ्या स्थानावर असलेल्या संघाला 3.5 कोटी रुपये बक्षीस म्हणून मिळतील. पाचव्या क्रमांकाच्या संघाला 1.1 कोटी रुपये आणि सहाव्या स्थानावरील संघाला 88 लाख रुपये मिळतील.
SA20 2024 असे मिळाले विजेत्यांना बक्षीस.
स्थान किंम(रँड्स) किंमत (INR अंदाजे)
-
प्रथम R34 दशलक्ष INR 15.13 कोटी
-
दुसरा R16.25 दशलक्ष INR 7.23 कोटी
-
तिसरा R8.9 दशलक्ष INR 3.96 कोटी
-
चौथे R7.85 दशलक्ष INR 3.47 कोटी
-
पाचवे R2.5 दशलक्ष INR 1.1 कोटी
-
6वा R2.0 दशलक्ष INR 89 लाख
SA20 2024 वैयक्तिक बक्षिसे
-
प्लेयर ऑफ द सीजन R350,000 INR 15.57 लाख
-
बॅटर ऑफ द सीझन R200,000 INR 8.9 लाख
-
बॉलर ऑफ द सीझन R200,000 INR 8.9 लाख
-
रायझिंग स्टार R100,000 INR 4.45 लाख
असे होते अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघ .
सनरायझर्स इस्टर्न केप संघ: एडन मार्कराम (कर्णधार), टॉम एबेल, ओटनील बार्टमन, टेम्बा बावुमा, लियाम डॉसन, सारेल एरवी, अया गकमाने, सायमन हार्मर, जॉर्डन हरमन, मार्को जॉन्सन, सिसांडा मॅगाला, डेविड मलान, क्रेग ओव्हरटन, ॲडम रोसिंग कालेब सेलेका, अँडिले सिमेलेन, ट्रिस्टन स्टब्स, बेअर्स स्वानेपोएल, डॅनियल वॉरॉल.
डरबन सुपर जायंट्स : केशव महाराज (कर्णधार), नूर अहमद, मॅथ्यू ब्रेट्झके, ज्युनियर डाला, क्विंटन डी कॉक, टोनी डी झोर्झी, हेनरिक क्लासेन, काइल मेयर्स, विआन मुल्डर, नवीन-उल-हक मुरीद, ब्राइस पार्सन्स, कीमो पॉल, निकोलस पूरन, ड्वेन प्रिटोरियस, भानुका राजपक्षे, जॉन-जॉन स्मट्स, जेसन स्मिथ, प्रेनलन सुब्रेन, रीस टोपली.
===
आमचे ईतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा : फेसबुक | इंस्टाग्राम | Copyright© yuvakatta.in| All Rights Reserved.