युवा फलंदाज शुभमन गिल हा सध्या भारतीय संघातील सर्वात चर्चेत असलेला खेळाडू आहे. याचं कारण म्हणजे, त्याने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघासाठी केलेली कामगिरी. त्याला जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा त्याने स्वतःला सिद्ध करून दाखवलं आहे.
मात्र अनेकदा असे प्रश्न विचारले जातात ज्याचं उत्तर देणं जरा कठीण जातं.असाच प्रश्न शुभमन गिलला विचारला गेला असता, त्याने काय उत्तर दिले चला पाहूया.
स्टार स्पोर्ट्सच्या एका शो मध्ये शुभमन गिलला विचारण्यात आले होते की, विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर या दोघांपैकी तुझा आवडता फलंदाज कोण? सुरुवातीला त्याने थोडा विचार केला.
मात्र त्यानंतर त्याने म्हटले की, ” खरं सांगू तर, मी विराट भाईची निवड करेल. कारण सचिन सरांना पाहून मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ज्यावेळी ते निवृत्त झाले त्यावेळी मी खूप लहान होतो. त्यामुळे मी नक्कीच विराट भाईंची निवड करेल. एक फलंदाज म्हणून मी विराट भाई कडून खूप काही शिकलो आहे.”
शुभमन गिलने न्यूझीलंड विरुध्द झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात २०८ धावांची तुफानी खेळी केली होती. असा पराक्रम करत त्याने दुहेरी शतकी खेळणाऱ्या फलंदाजांच्या यादीत प्रवेश केला होता. त्यानंतर दुसऱ्या वनडेत त्याला मोठी खेळी करता आली नव्हती.
मात्र तिसऱ्या वनडेत त्याने जोरदार शतकी खेळी केली होती. या मालिकेतील ३ सामन्यांमध्ये त्याने १८० च्या सरासरीने ३६० धावा केल्या होत्या.
हे ही वाचा..
पाकिस्तानचा ‘हा’ क्रिकेटपटू स्वतःला म्हणतोय विराट कोहली पेक्षा श्रेष्ठ..
हृदयद्रावक घटना!गोलंदाजी करत असताना ३२ वर्षीय तरुणाने गमावला जीव